पॉझिटिव्ह बातमी! कोरोनाच्या सर्व प्रमुख व्हेरियंटवर भारताची ‘ही’ लस प्रभावी

Union Health Ministry reduces gap for COVID-19 precaution doses from existing 9 months to 6 months for those above 18 years

जगभरात सध्या कोरोना व्हायरसचे वेगवेगळे व्हेरियंट सरकारची डोके दुःखी झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढत आहे. अल्फा, बीटा, डेल्टा, लॅम्बडासह इतर कोरोनाचे व्हेरियंट वैज्ञानिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. यादरम्यानच भारताने एक अशी लस विकसित केली आहे, जी कोरोनाच्या सर्व प्रमुख व्हेरियंट विरोधात प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बायोटेक फार्म Mynvaxसोबत संयुक्तरित्या काम करत असलेल्या भारतीय विज्ञान संस्थान (IISc)च्या वैज्ञानिकांनी ‘वार्म’ लस तयार केली आहे. ही वार्म लस (Warm Vaccine) सर्व प्रमुख कोरोना व्हेरियंट विरोधात प्रभावी असल्याचे सांगितले गेले आहे.

प्राण्यांवर झालेल्या अभ्यासानुसार भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरूद्वारे विकसित केलेली वार्म कोरोना लस, सर्व चिंताजनक व्हेरियंट (जसे की, अल्फा, बीटा , कप्पा, डेल्टा) विरोधात प्रभावी आहे. गुरुवारी एसीएस इंपेक्शियस डिजीज जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात आढळले की, आयआयएससी-इनक्यूबेटेड बायोटेक स्टार्ट-अप मायनवॅक्स (Mynvax)द्वारे या लसीमुळे उंदिरांमध्ये एक मजबूत प्रतिकारशक्ती विकसित झाली.

माहितानुसार, फॉर्मूलेशन CSIRO ऑस्ट्रेलियद्वारे आयोजित केले होते. ज्यानुसार ही वार्म लस शरीरात गेल्यानंतर अँटिबॉडी निर्माण करते. या अँटीबॉडी शरीरात शिरकाव होणाऱ्या प्रत्येक व्हेरियंटच्या परिणामावर काम करू शकते. म्हणजेच व्हेरियंटचा प्रभाव कमी करू शकते. प्रोफेसर राघवन वरदराजन यांच्या नेतृत्वाखाली या लसीचा शोध लागला आहे.

काय आहे वार्म लस? जाणून घ्या फायदे

दरम्यान ही लस ३७ डिग्री सेंटीग्रेडवर एक महिना राहू शकते आणि १०० डिग्री सेंटीग्रेडवर ९० मिनिटांपर्यंत राहू शकते. म्हणून या लसीला वार्म लस नाव दिले गेले आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की, देशातील कोणत्याही ठिकाणी लस पाठवण्यासाठी कोल्ड चेन निर्माण करावी लागते. अशाप्रकारे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि शहरांमध्ये लस पोहोचवली जाते. यामुळे लस लोकांपर्यंत पोहोचण्यास अजूनही उशीर होत आहे. अशात वार्म लसीमुळे लसीकरणात बराच वेग येईल.