उत्तर भारतातील ‘या’ राज्यांमध्ये थंडी आणि मुसळधार पावसाचा IMDचा इशारा

उत्तर भारतातील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासोबतच हिमवृष्टीचीही शक्यता बळावली आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आणि थंडीच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळत आहे.

Winter in Maharashtra :Mahabhaleshwar looks like Kashmir

उत्तर भारतातील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासोबतच हिमवृष्टीचीही शक्यता बळावली आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आणि थंडीच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र आता थंडी वाढण्याची शक्यता आहे. (india weather update imd alert heavy rainfall heavy snowfall north)

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार पाऊस आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात पावसाची शक्यता आहे. यासोबतच डोंगराळ भागात हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘पुढील तीन दिवसांत पूर्व भारतातील अनेक भागांत किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत हिमाचल प्रदेश आणि बिहार आणि पुढील 48 तासांत ओडिशामध्ये रात्री आणि सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे’, असे हवामान विभागाने सांगितले.

मागील 24 तासांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थान, बिहार, पूर्व राजस्थान आणि उत्तर-पश्चिम मध्यच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान 6-10 अंश सेल्सिअसच्या श्रेणीत राहिल्याची माहितीही आयएमडीने दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसा, 24 ते 26 जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात उच्च आर्द्रतेसह वेस्टर्न डिस्टर्बन्स अरबी समुद्रातून पूर्वेकडे सरकेल. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, 22 आणि 23 जानेवारी रोजी पश्चिम हिमालयीन भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची तीव्रता वाढेल. त्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान पाऊस किंवा हिमवर्षाव वाढेल. तसेच, 24 आणि 25 जानेवारीला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टीची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

25 आणि 26 जानेवारीला उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडेल. 23 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. 24-26 जानेवारी दरम्यान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचे प्रमाण वाढेल. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये 24 जानेवारीला गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशात 24 आणि 25 जानेवारीला, पश्चिम उत्तर प्रदेशात 25 जानेवारीला, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि 24 ते 26 जानेवारी दरम्यान चंदीगडमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. 24 ते 26 जानेवारी दरम्यान उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – बाळासाहेबांची जयंती, पक्षप्रमुखपदाचा शेवटचा दिवस; मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार?