घरदेश-विदेशअन्यथा भारत ‘नाझी’ राष्ट्र बनेल - मद्रास उच्च न्यायालय

अन्यथा भारत ‘नाझी’ राष्ट्र बनेल – मद्रास उच्च न्यायालय

Subscribe

प्रसारमाध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. पण, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांची गळचेपी झाल्यास भारत नाझी राष्ट्र बनेल अशी चिंता मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे.

प्रसारमाध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. पण, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांची गळचेपी झाल्यास भारत नाझी राष्ट्र बनेल अशी चिंता मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे. यावेळी न्यायालयानं तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्यावतीनं २०१२मध्ये एका मॅक्झिमविरोधात दाखल केलेली मानहानीसंदर्भातील फौजदारी तक्रार देखील रद्द केली. याविषयी न्यायमूर्ती पी. एन. प्रकाश यांनी अनेक महत्त्वाची निरिक्षणं देखील नोंदवली आहेत. यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती पी. एन. प्रकाश यांनी कनिष्ठ न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे असं म्हटलं. देशातील प्रचार माध्यमांवर दबाव टाकल्यास लोकशाही धोक्यात येईल असं देखील न्यायालयानं यावेळी म्हटलं. भारतीय लोकशाही चैतन्यशील आहे. प्रसारमाध्यमं लोकाशाहीचा निर्विवादित चौथा स्तंभ आहेत. त्यामुळे चौथ्या स्तंभाची मुस्काटदाबी केल्यास भारत जुलूमशाहीचा देश होईल. असे देखील न्यायालयानं म्हटलं आहे. शिवाय, स्वातंत्र्यसैनिक आणि घटनाकारांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाईल. काही वेळा प्रसारमाध्यमांकडून उल्लंघन झाल्यास लोकशाहीच्या हिताचा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं यावेळी न्यायालयानं म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -