Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Good News! चार महिन्यांत येणार कोरोनाची लस, आरोग्य मंत्र्यांची माहिती

Good News! चार महिन्यांत येणार कोरोनाची लस, आरोग्य मंत्र्यांची माहिती

आगामी वर्षातील पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरू असून कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी वर्षातील पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच, ही लस जुलै-ऑगस्टपर्यंत २५ ते ३० कोटी लोकांना लस देण्याची योजना आहे. यासह आम्ही तयारी करत आहोत. अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

- Advertisement -

यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांना कोरोनाचे नियम पाळावे, अशी विनंती केली. यासह ते असेही म्हणाले की, पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील लोकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. “माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत. त्यानुसार वर्तन करावे. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब आहे.”, असे आवाहनही आंदोलक शेतकऱ्यांना हर्षवर्धन यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात अद्याप सुरू आहे. गेल्या २४ तासात देशात गेल्या २४ तासात ३८,७७२ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत बाधितांचा आकडा ९४ लाख ३१ हजार ६९२ इतका झाला आहे. तर गेल्या २४ तासात ४४३ जणांचे प्राण कोरोनामुळे गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४५ हजार ३३३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -