घर देश-विदेश 'INDIA' आता होणार 'BHARAT'? आसामच्या मुख्यमंत्र्यांचे संकेत; ट्विटरमध्ये काय म्हटले आहे?

‘INDIA’ आता होणार ‘BHARAT’? आसामच्या मुख्यमंत्र्यांचे संकेत; ट्विटरमध्ये काय म्हटले आहे?

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नेहमीच देशवासियांना गुलामगिरीची मानसिकेतून आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी बदलण्यासाठी सतत काम करताना दिसत आहेत. संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात केंद्र सरकार राज्यघटनेतून ‘इंडिया’ (Inddia) शब्द हटवण्यासाठी विधेयक आणू शकते आणि ‘भारत’ (Bharat) असे नाव करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रस्तावाची तयारी सुरू असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. अशातच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत. (INDIA will now be BHARAT Signals from Chief Minister of Assam What does Twitter say)

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करताना म्हटले की, भारतीय प्रजासत्ताक आनंदी आणि अभिमानास्पद आहे. आमची सभ्यता धैर्याने अमृत काळाकडे जात आहे. त्याचवेळी, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही म्हटले की, प्रत्येक गोष्टीत अडचण आहे, त्यामुळे मला काही बोलायचे नाही. मी एक ‘भारतीय’ आहे. माझ्या देशाचे नाव ‘भारत’ होते आणि नेहमीच ‘भारत’ राहील.

- Advertisement -

मोहन भागवत यांनीही भारत शब्दाचा वापर करण्याची केली होती विनंती

काही दिवसांपूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी एका सभेला संबोधित करताना देशवासियांना इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरण्याची विनंती केली होती. ते म्हणाले होती की, आपल्या देशाचे नाव शतकानुशतके भारत आहे. भाषा कोणतीही असो, नाव तेच राहते. आपला देश भारत आहे. आपण इंडिया हे नाव वापरणे बंद करून सर्व व्यावहारिक क्षेत्रात भारत असे वापरले पाहिजे, तरच बदल येईल, असेही ते मोहन भागवत म्हणाले होते. त्यांनी असेही म्हटले की, मला माझ्या देशाला भारत म्हणायचे आहे आणि इतरांनीही ते समजून घ्यायला पाहिजे. भारत हा सर्वांना एकत्र करणारा देश आहे. आज जगाला आपली गरज आहे. जग आपल्याशिवाय चालू शकत नाही. आपण योगाद्वारे जग जोडले आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेसचा ‘भारत’ नावावर आक्षेप 

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करताना दावा केला की, ही बातमी खरी आहे. राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरसाठी ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताच्या राष्ट्रपती’च्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत. मात्र संविधानाच्या आर्टिकल 1 नुसार, भारत जो इंडिया आहे, जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु, आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisment -