घरदेश-विदेशबर्मिगहम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी, पदकसंख्या 26 वर

बर्मिगहम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी, पदकसंख्या 26 वर

Subscribe

बर्मिगहम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत 26 पदके जिकंली आहेत.

इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरू कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारतीय खेलाडूंनी चमकदार खेळ दाखवत सहा पदंके जिकंली आहेत. यात तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सनी उत्तम कामगिरी केली. तर कुस्तीपटूंची कामगिरी ही विशेष ठरली आहे.

भारताच्या सहाच्या 6 कुस्तीपटूंनी पदके जिंकली. यामुळे भारताची पदकसंख्या 26 वर पोहोचली आहे. तर लॉन बाऊल्समध्ये पुरुषांच्या गटाने इंग्लंडला 13-12 ने मात देत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे.

- Advertisement -

बजरंग, दीपकसह साक्षीला सुवर्ण पदक –

भारताच्या पुरुष आणि महिला कुस्तीपटूंनी उत्तम कामगिरी केली आहे. रुषांमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनियातर महिलांमध्ये साक्षी मलिक यांनी सुवर्णपदक पटकावले. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनीला पराभूत केले. साक्षी मलिकने फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात सुवर्णपदक मिळवले. तिने कॅनडाच्या अॅना गोंझालेजला मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. यानंतर 86 किलोग्राम गटात भारताच्या दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मुहम्मद इनामला हारवत सुवर्णपदक मिळवले.

- Advertisement -

अंशूला मलिकला रौप्य पदक –

कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले कुस्ती खेळातील पदक महिला कुस्तीपटू अंशू मलिकने  मिळवून दिले आहे. 57 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात तिला नायजेरियाच्या अडेकुरोये हीने मात दिल्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

मोहितसह दिव्याने जिंकले कांस्यपदक –

कॉमनवेल्थ स्पर्धेतील आठवा दिवस भारताच्या कुस्तीपटूंसाठी अत्यंत खास ठरला. विशेष म्हणजे भारताच्या आज मैदानात उतरलेल्या सर्वच्या सर्व कुस्तीपटूंनी पदक नावे केले आहे. पुरुषांच्या 125 किलोग्राम वजनी गटात मोहित ग्रेवालने कांस्य पदक नावे केले आहे. आधीच्या सामन्यात पराभूत मोहितने आता जमाईकाच्या आरॉन जॉन्सनला  मात देत कांस्य पदकावर नाव कोरंले. महिलांच्या 68 किलोग्राम वजनी गटात दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवले. आधीच्या सामन्यात पराभूत झालेल्या दिव्याने तिसऱ्या स्थानासाठीचा सामना जिंकत कांस्य मिळवले. तिने टोंगाच्या टायगर लिली कॉकर लेमाली हिला मात देत पदक जिंकले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -