घरदेश-विदेशभारतीय कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा

भारतीय कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा

Subscribe

भारतीय सुरक्षा समिती सल्लागार अजित डोवाल यांची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवर चर्चा.

भारताच्या काश्मीर मधील पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईला अमेरिकेने पाठिंबा दर्शवला आहे. भारताने मंगळवारी एअरस्ट्रईक करत पाकव्याप्त काश्मीर मधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना नेस्तनाभूत केले. या कारवाई विषयी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पेओ यांच्याशी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी फोनवर संवाद साधला आहे. बुधवारी रात्री उशिरा या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यामध्ये चर्चा झाली. या संभाषणा दरम्यान पाकिस्तानच्या बालाकोट मधील जैश ए मोहम्मदच्या तळावर भारतीय हवाई दलाने केलेली कारवाई योग्यच असल्याच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पेओ म्हटले आहे. त्याच बरोबर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी देखील चर्चा केली असून कोणतीही कारवाई करणे टाळा असे आवाहन केल्याच त्यांनी या संभाशनामध्ये सांगितले आहे.

भारताला पाठिंबा

- Advertisement -

भारताने केलेल्या कारवाईला अमेरिकेने पाठिंबा दर्शवला आहे. आपण भारता सोबत असल्याच देखील अमेरिकेने सांगितले आहे. याआधी देखील अमेरिकेने भारतीय लष्करावर कारवाई करु नका, दहशतवादा विराधी कारवाई करा. दहशतवाद्यांना आसरादेणे बंद करा अशा शब्दात पाकला सुनावले होते. त्याच बरोबर दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आणि सिमेवरील चकमकी थांबवण्याचे अवाहन देखील अमेरिकेन केले आहे.

- Advertisement -

सुरक्षा परिषदेतही पाठिंबा

दरम्यान काश्मीरच्या पुलवामा हल्ल्याचा सुत्रधार, जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला अंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावत देखील त्यांनी पुढाकार घेतला आहे. एकूणच जागतिक स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी देखील भारताला अमेरिकेच चांगल सहकार्य मिळत आहे. अमेरिके सारख्या देशाने भारताला पाठिंबा दिल्याने भारताच्या परराष्ट्र धोरणाला देखील मोठ्या प्रमाणात यश येताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -