घरदेश-विदेशआज 'मिग २७' विमानांचा प्रवास संपणार

आज ‘मिग २७’ विमानांचा प्रवास संपणार

Subscribe

भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान म्हणून ओळखलं जाणारं ‘मिग २७’ विमानांना अखेराचा निरोप शुक्रवारी देण्यात येणार आहे. ‘मिग २७’ या विमानांनी जवळपास चार दशकांहून अधिक काळ पराक्रम गाजवला आहे. मात्र आता या लढाऊ विमानांचं युग संपणार आहे. ‘मिग २७’ श्रेणीतील सात लढाई विमानांचा प्रवास संपणार असून शुक्रवारी अखेरचं जोधपूर एअरबेसवर उड्डाण होणार आहे. या विमानांना निरोप देण्यासाठी हवाई दलाच्या सूर्यकिरण विमानांची टीम जोधपूर येथे पोहोचली आहे. तसंच सूर्यकिरण विमानांच्या थरारक प्रात्यक्षिकांच्या साक्षीनं ‘मिग २७’ या विमानांचा सन्मान केला जाणार आहे.

या विमानांना हवाई दलाकडून देखील सॅल्यूट केला जाणार आहे. सध्याच्या स्थितीत ‘मिग २७’ श्रेणीतील विमानं इतर कोणत्याही देशात वापरले जात नाहीत. ही लढाऊ विमानं फक्त भारतातचं वापरली जात होती, असं सुत्रांच्या माहितीनुसार समोर आलं आहे.

- Advertisement -

भारतीय हवाई दलातील ‘मिग २७’ हे लढाऊ विमान हवेतून जमिनीवर मारा करणारे उत्तम विमान आहे. हे विमान पहिल्यांदा भारतीय हवाई दलात १९८१ साली दाखल झाले होते. या विमानांची चार हजार किलो वजनाची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. तसंच तब्बल १७०० किमी प्रतितास इतका तुफान या विमानांचा वेग आहे. या विमानातील तांत्रिक अडचणी दूर करणं शक्य नसल्यामुळे जवळपास तीन वर्षापूर्वी या विमानांना हवाई दलातून हटवण्याचा निर्णय घेतला होता.


हेही वाचा – ‘लोकांना चुकीच्या दिशेने नेतात ते नेते नसतात’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -