घरदेश-विदेशपाकिस्तानला पुन्हा झटका; भारतीय वायू सेनेने पाकचे ड्रोन पाडले

पाकिस्तानला पुन्हा झटका; भारतीय वायू सेनेने पाकचे ड्रोन पाडले

Subscribe

भारतीय वायूसेनेने राजस्थान सीमेवर हवेत उडणारे एक अज्ञात यंत्र पाडल्याचे वृत्त समोर येत आहे. आज सकाळी ११.३० सुमारास राजस्थानमधील भारत – पाकिस्तान सीमेवर हे यंत्र उडताना भारतीय वायूसेनेला दिसले होते. हे यंत्र ड्रोन असण्याची शक्यता वायूदलाने वर्तवली आहे. वायूसेनेने पाकिस्तानचे ड्रोन हवेतच मिसाईल सोडून पाडले. या ड्रोनचे अवशेष पाकिस्तानमध्ये पडले असून त्या जागेला एमडब्लू टोबा म्हणतात, असे सांगण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असाताना ही बातमी आली आहे.

पाकिस्तानचे ड्रोन पाडले ही बातमी येण्याअगोदर ट्विटरवर पाकिस्तानच्या नागरिकांनी भारताने आणखी एक एअर स्ट्राईक केला असल्याची बातमी पसरली होती. पाकिस्तानातील नेटीझन्सनी या ड्रोनच्या अवशेषाचे फोटो आणि व्हिडिओ देखील ट्विटरवर शेअर केले आहेत. काहींनी ट्विटरवर म्हटले आहे की, हा हल्ला पंजाबच्या अब्बास किल्ल्याजवळ झाल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -