भारतीय वायु सेनेचे मिग – २१ विमान क्रॅश; पायलटचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील कांगारा जिल्ह्यामध्ये भारतीय वायु सेनेच्या मिग - २१ या विमानाचा अपघात झाला आहे. पण, पायलट मात्र बेपत्ता आहे.

mig - 21 crash
भारतीय वायु सेनेच्या मिग - २१ला अपघात

हिमाचल प्रदेशमधील कांगारा जिल्ह्यामध्ये भारतीय वायु सेनेच्या मिग – २१ या विमानाला अपघात झाला आहे. विमान अपघातामध्ये पायलटचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायुसेनेच्या पठाणकोठ विमानतळावरून मिग – २१ या विमानाने उड्डाणे केले. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील कांगारा जिल्ह्यामध्ये विमानाला अपघात झाला. या अपघातामध्ये पायलटचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय वायु सेनेच्या विमानांच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. आज ( बुधवारी ) दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी हा अपघात झाला. दरम्यान न्यायालयाने या अपघाताची चौकशी करा असे आदेश दिले आहेत. अपघातस्थळी विमानाचे अवशेष हे जळालेल्या अवस्थेमध्ये सापडले आहेत. मागील दोन महिन्यातून भारतीय वायु सेनेच्या विमानाचा हा दुसरा अपघात आहे. जूनमध्ये जग्वार विमानाला झालेल्या अपघातामध्ये देखील पायलटला आपला जीव गमवावा लागला होता.

mig - 21 accident
भारतीय वायु सेनेच्या मिग – २१ विमानाचा अपघात, पायलटचा मृत्यू

वाचा – धक्कादायक; पुन्हा एकदा एअर फोर्सच्या फायटर विमानाला अपघात

वाचा – गुजरातमध्ये वायूदलाच्या विमानाला अपघात, पायलटचा मृत्यू