घरदेश-विदेशअनिल कपूरचा 'Ak vs Ak' वादाच्या भोवऱ्यात, भारतीय हवाई दलाने दर्शविला आक्षेप

अनिल कपूरचा ‘Ak vs Ak’ वादाच्या भोवऱ्यात, भारतीय हवाई दलाने दर्शविला आक्षेप

Subscribe

सिनेमातील सीन कोणताही विलंब न करता काढून टाका, असे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे.

बॉलिवुड अभिनेता अनिल कपूरचा AK vs Ak हा नवा सिनेमा नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेल्या एका सीनविषयी भारतीय हवाई दलाने ट्विट करून आक्षेप नोंदवला आहे. या सिनेमातील दाखवण्यात आलेली काही दृष्ये वगळण्यात यावी असं भारतीय हवाई दलाने नेटफ्लिक्सला सांगितले आहे.

- Advertisement -

Ak vs AK या सिनेमात अभिनेता अनिल कपूर आणि अनुराग कश्यप हे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अनिल कपूर हवाई सेनेच्या वर्दीत दिसत आहे. या सीनमध्ये भारतीय वायु सेनेच्या वर्दीच्या चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे. त्याचबरोबर यात अनिल कपूरने वापरलेली भाषा ही योग्य नाही. या सीनमध्ये भारतीय हवाई दलाच्या सर्व नियमांचे उल्लघन करण्यात आले आहे. त्यामुळे हा सीन कोणताही विलंब न करता काढून टाका, असे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे.

अनिल कपूर आणि अनुराग कश्यपचा नवीन सनेमाचा AK vs AKचा एक ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला. ज्यात अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांचा एक सीन दाखवण्यात आला आहे. ज्यात अनुराग कश्यप अनिल कपूरला अपहरण झालेल्या सोनम कपूरला दहा तासांच्या आत शोधण्याचे आव्हान देतो. या सीनमध्ये अनिल कपूर भारतीय हवाई दलाच्या गणवेशात दिसत आहे. त्यातील त्याची वागणूक भारतीय हवाई दलाच्या नियमांचे उल्लघन केले आहे, असे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे. अनिल कपूरचा Ak vs Ak हा सिनेमा२४ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना काळात मदत केल्यामुळे सोनूवर कोट्यावधीचं कर्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -