घरट्रेंडिंगपाहा : 'त्या' बेपत्ता जवानाचा Video व्हायरल

पाहा : ‘त्या’ बेपत्ता जवानाचा Video व्हायरल

Subscribe

भारताचे जे लढाऊ विमान पाकिस्तानाच्या हद्दीत पडले त्याचा वैमानिक आमच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. ‘रेडिओ पाकिस्तान’ या ट्वीटर अकाउंटवरुन हा दावा करणारा  एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे हात आणि डोळे बांधले आहेत. या व्यक्तीला त्याची ओळख विचारली असता तो आपलं नाव अभिनंदन वर्थमान असल्याचं सांगून, आपला सर्व्हिस क्रमांक २७९८१ असल्याचं सांगताना दिसत आहे. याशिवाय आपण हिंदू धर्माचे असून भारतीय वैमानिक असल्याचंही ही व्यक्ती सांगते आहे. दरम्यान, ही व्यक्ती पाकिस्तानच्या हद्दीत पडलेल्या मिग-२१ या लढाऊ विमानाचा चालक असून, तो आमच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दरम्यान, हा संपूर्ण व्हिडिओच खोटा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. तर दुसरीकडे, भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रावीष कुमार आणि एअर वाईस मार्शल आर.जी.के. कपूर यांनी पाकिस्तनाचा दावा खोटा असल्याचं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

आर.जी.के. कपूर यांनी तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय वायुसेनेबाबतची माहिती दिली. पाकने यासंदर्भात सोशल मीडियाद्वारे व्हायरल केलेले व्हिडिओ आणि फोटोज खोटे असल्याचे कपूर यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना कपूर म्हणाले की, ‘हा व्हिडिओ २ वर्षांपूर्वीचा असून, त्याबाबची कोणतीही माहिती समोर येत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या अफवांवर आणि व्हायरल होणाऱ्या कुठल्याही व्हिडिओवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि असे व्हिडिओ कुणीही व्हायरल करु नये’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -