Homeदेश-विदेशIndian Airlines IC-814 : आयुष्य हे अनपेक्षित आहे...कंदहार विमान अपहरणातील वैमानिक देवी...

Indian Airlines IC-814 : आयुष्य हे अनपेक्षित आहे…कंदहार विमान अपहरणातील वैमानिक देवी शरण काय म्हणाले…

Subscribe

इंडियन एअरलाइन्सचे IC 814 हे विमान लक्षात नाही, असा क्वचितच कोणी असेल. होय, हे तेच विमान आहे जे डिसेंबर 1999 मध्ये कंदहार येथे नेण्यात येऊन हायजॅक (hijack) करण्यात आले होते. या विमानाचे वैमानिक कॅप्टन देवी शरण हे शनिवारी निवृत्त झाले.

नवी दिल्ली : इंडियन एअरलाइन्सचे IC 814 हे विमान लक्षात नाही, असा क्वचितच कोणी असेल. होय, हे तेच विमान आहे जे डिसेंबर 1999 मध्ये कंदहार येथे नेण्यात येऊन हायजॅक (hijack) करण्यात आले होते. या विमानाचे वैमानिक कॅप्टन देवी शरण हे शनिवारी निवृत्त झाले. (indian airlines hijacked aircraft ic 814 fame captain devi sharan retires plans to do farming in karnal)

वैमानिक म्हणून आपले शेवटचे उड्डाण केल्यानंतर आपल्या फेअरवेल कार्यक्रमात कॅप्टन देवी शरण म्हणाले की, आता प्रवासी म्हणून मी देखील माझ्या आजूबाजूला सगळं व्यवस्थित आहे की नाही हे नक्कीच पाहीन. आता वैमानिक म्हणून विमान उडवणार जरी नसलो तरी प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी नेहमीच असेल.

हेही वाचा – Justin Trudeau resigned : अखेर जस्टिन ट्रूडो यांचा राजीनामा; पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडले

कंदहार हायजॅक प्रकरणी प्रवाशांना सोडवण्यासाठी भारताने हाफिज सईद या महत्त्वाच्या दहशतवाद्याला मुक्त केले होते. त्यावेळी त्या विमानाचे वैमानिक हे देवी शरण हेच होते. वैमानिक म्हणून 40 वर्षे सेवा केल्यानंतर शरण हे शनिवारी निवृत्त झाले. या 40 वर्षांच्या सेवेत त्यांच्यासमोर अनेक आव्हानात्मक प्रसंग आले. कॅप्टन एसपीएस सूरी आणि केबिन क्रू मेंबर्ससह अंतर्गत वादात सापडलेल्या लिबियामध्ये अडकले होते. आपल्या निरोप समारंभात ते म्हणाले की, आयुष्य हे अत्यंत अनपेक्षित असते. यावेळी कॅप्टन शरण यांनी आपण निवृत्तीनंतर काय करणार आहोत, हे देखील सांगितले.

कॅप्टन देवी शरण यांनी 1985 मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये जॉइन झाले. जवळपास 40 वर्षे सेवा देऊन ते निवृत्त झाले. आयसी 814 हायजॅकने मला सांगितले की, आयुष्य हे अनपेक्षित आहे आणि व्यक्तीला नेहमीच कोणत्याही प्रसंगासाठी तयार असायला हवे. तो काळ माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ होता. आणि त्यावेळी माझे एकमेव उद्दिष्ट हे विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवणे हेच होते. कोणीही क्रू मेंबर, प्रवासी यांच्या आयुष्यात असा क्षण येऊ नये, असेही शरण म्हणाले.

हेही वाचा – India Condemns Pakistan Airstike : नाचता येईना…अफगाणिस्तानातील पाकिस्तानच्या हल्ल्यांवरून भारत भडकला

कॅप्टन देवी शरण तसेच इंडियन एअरलाइन्सच्या प्रवाशांनी अनुभवलेला कंदहार हायजॅक हा एकच प्रसंग नाही. 1 जानेवारी 2000 रोजी हायजॅक विमान पुन्हा भारतात आणल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला होता. कॅप्टन देवी शरण यांनी बोइंग 737-200 च्या साहाय्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी एअरबस ए320 आणि ए330 देखील उडवले आहे. हे तेच विमान आहे, जे कंदहारमध्ये उतरवण्यात आले होते.

निवृत्त झाल्यानंतर आता कॅप्टन देवी शरण करनालमध्ये शेती करणार आहेत. तसेच एअर इंडियाच्या मेगा ट्रेनिंग फॅसिलिटीचा देखील भाग होऊ शकतील.