घरताज्या घडामोडीएनडीए कोर्सचे तीन मित्र आज लष्कर, नौदल आणि हवाई दलचे प्रमुख

एनडीए कोर्सचे तीन मित्र आज लष्कर, नौदल आणि हवाई दलचे प्रमुख

Subscribe

भारताचे हवाई दल, लष्कर आणि नौदलाचे नेतृत्व हे एकाच तुकडीतील तीन अधिकारी करत आहेत. लष्करप्रमुख मनोज पांडे, वायुसेना प्रमुख विवेक राम चौधरी आणि नौदल प्रमुख आर हरी कुमार हे एनडीए अभ्यासक्रमात एकत्र होते. जनरल मनोज पांडे यांनी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली आहे.

भारताचे हवाई दल, लष्कर आणि नौदलाचे नेतृत्व हे एकाच तुकडीतील तीन अधिकारी करत आहेत. लष्करप्रमुख मनोज पांडे, वायुसेना प्रमुख विवेक राम चौधरी आणि नौदल प्रमुख आर हरी कुमार हे एनडीए अभ्यासक्रमात एकत्र होते. जनरल मनोज पांडे यांनी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली आहे. रविवारी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यानंतर साऊथ ब्लॉक परिसरात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी हवाई दल आणि नौदल प्रमुखही उपस्थित होते.

याआधी ही भारतात एकाच तुकडीतील तीन मित्रांनी भारताच्या लष्कराची सुत्रे हाती घेतली होती. जनरल (निवृत्त) मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख (निवृत्त) राकेश कुमार सिंह भदौरिया आणि अॅडमिरल (निवृत्त) करमबीर सिंग हे देखील बॅचमेट होते, ज्यांनी एकत्रितपणे तिन्ही सेवांचा कार्यभार स्वीकारला होता.

- Advertisement -

‘सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज आहे. भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास असून, राष्ट्र उभारणीत लष्कराचा मोठा वाटा आहे. सध्या जगाचे चित्र झपाट्याने बदलत आहे. यावर तिन्ही सेना एकत्र काम करतील. आजच्या परिस्थितीसाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेशनसाठी तयार राहावे लागेल’, असे जनरल मनोज पांडे यांनी सांगितले.

‘लष्कराने देशाची सुरक्षा आणि अखंडता राखण्यासाठी काम केले आहे. आमचे प्राधान्य ऑपरेशनल सज्जतेवर असेल आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत नवीन तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. आपापसातील शक्तींचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असंही यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – LPG Cylinder Price: एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -