भारतीय लष्कराने सिंधू नदीवर बांधला पूल, चीनला देणार सडेतोड उत्तर

bridge over the sindhu river by indian army

भारतीय लष्कराच्या कोर ऑफ इंजिनिअर्सने लडाख सेक्टरच्या सिंधू नदीवर एक पूल तयार केला आहे. भारतीय लष्कराच्या प्रभावशाली अभियांत्रिक कौशल्याचा एक नमुना व्हिडीओमार्फत शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सिंधू नदीवर पूल तयार करताना दिसत आहेत. ‘Bridging Challenges – No Terrain nor Altitude Insurmoutable’ असं या मोहिमेला नाव देण्यात आलं आहे.

चीनच्या सीमेवर असलेल्या लडाख सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी बांधलेले सिंधू नदीवरील पूल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. भारतीय सीमेवर चिनी जवानांची नजर असते. या पुलामुळे भारतीय सेना चीनविरोधात लढू शकतो.

गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सीमेवर चिनी घुसखोरी वाढली आहे. भारताच्या सीमेवर चीनकडून हल्ले केले जातात. या पुलामुळे भारतीय लष्कराला चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी बळ मिळणार आहे.