घरदेश-विदेशभारतीय सेनेचे 'चीता' हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये कोसळले, दोन्ही पायलट ठार

भारतीय सेनेचे ‘चीता’ हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये कोसळले, दोन्ही पायलट ठार

Subscribe

इटानगर : अरुणाचल प्रदेशात गुरुवारी लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर कोसळले. मंडला हिल्सजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलटांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी 09:15 च्या सुमारास या हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ उड्डाण केले आणि काही वेळातच हेलिकॉप्टरचा एटीसीशी संपर्क तुटला. बोमडिलाच्या पश्चिमेला मंडलाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त आहे. या हेलिकॉप्टर अपघातात दोन्ही पायलटांचा मृत्यू झाला आहे. दुपारी चारच्या सुमारास या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. लेफ्टनंट कर्नल व्हीव्हीबी रेड्डी आणि मेजर जयंत ए असे मृत्यू  झालेल्या दोन्ही पायलटांचे मृतदेह अपघातस्थळावरून सापडले आहेत. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

आठच दिवसांपूर्वी ‘ध्रुव’चे इमर्जन्सी लॅण्डिंग
भारतीय नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे गेल्या बुधवारी मुंबईच्या समुद्र किनारी इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. नौदलाचे अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) मुंबईहून नियमित उड्डाणासाठी जात असताना या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली होती. हेलिकॉप्टरमधील तीन क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

- Advertisement -

चित्ता हेलिकॉप्टरलाही अपघात
गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर नियमित उड्डाण करताना कोसळले होते. या अपघातात लष्कराचे दोन पायलट जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लष्कराच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार तवांगच्या फॉरवर्ड एरिया, जेमिथँक सर्कलच्या बाप टेंग कांग फॉल्स क्षेत्राजवळील न्यामजांग चू येथे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नियमित उड्डाणाच्या दरम्यान हा अपघात झाला होता. दोन वैमानिकांसह हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून नित्यनेमाने येत होते.
अपघाताची माहिती मिळताच मदत बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दोन गंभीर जखमी वैमानिकांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. दोन वैमानिकांपैकी एक लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तवांगमधील हेलिकॉप्टरचा हा पहिला अपघात नव्हता. 2017 मध्ये, वायुसेनेचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर क्रॅश होऊन पाच IAF क्रू मेंबर्स आणि दोन आर्मी ऑफिसरचा मृत्यू झाला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -