घरताज्या घडामोडीIndian Army Combat Uniform : भारतीय लष्कराच्या जवानांचा नवा कॉम्बॅट युनिफॉर्म पाहिलात...

Indian Army Combat Uniform : भारतीय लष्कराच्या जवानांचा नवा कॉम्बॅट युनिफॉर्म पाहिलात ? जाणून घ्या वैशिष्ट्ये

Subscribe

भारतीय लष्करातील जवानांचा लढाऊ गणवेश बदलण्यात आला आहे. काल 15 जानेवारी 2021 या दिवशी आर्मी डे परेड दरम्यान, सैनिकांसाठी नवीन लढाऊ गणवेशाचे अनावरण करण्यात आले आहे. हवामानापासून संरक्षण आणि जवानांचे प्रत्यक्ष युद्धभूमीवर संरक्षण होण्याकरीता हा नवा लढाऊ गणवेश तयार करण्यात आला आहे.

भारतीय लष्करातील जवानांचा लढाऊ गणवेश बदलण्यात आला आहे. काल 15 जानेवारी 2021 या दिवशी आर्मी डे परेड दरम्यान, सैनिकांसाठी नवीन लढाऊ गणवेशाचे अनावरण करण्यात आले आहे. हवामानापासून संरक्षण आणि जवानांचे प्रत्यक्ष युद्धभूमीवर संरक्षण होण्याकरीता हा नवा लढाऊ गणवेश तयार करण्यात आला आहे. मेक इन इंडियाच्या अनुषंगाने सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इंस्टीट्यूड ऑफ फॅशन टेक्नोलॉजी यांच्याद्वारे संयुक्तपणे करण्यात आली आहे. जवळपास 15 डिझाइनचा विचार या गणवेशाकरीता करण्यात आला होता.

- Advertisement -

 

भारतीय लष्कराच्या जवानांचा नव्या कॉम्बॅट युनिफॉर्मची वैशिष्ट्ये 

  •  हवामानापासून संरक्षण होईल अशाप्रकारचे गणवेश तयार करण्यात आले आहेत.
  •  जवानांच्या विविध भूप्रदेशाचा विचार करुन गणवेश डिझाइन करण्यात आले आहे.
  •  गणेवेशामधील कापडात 70 टक्के कापूस आणि 30 टक्के पॉलिस्टरचे प्रमाण असणार आहे.
  •  पॉलिस्टरच्या वापरामुळे गणवेशासाठी वापरण्यात आलेले फॅब्रिक लवकर कोरडे होईल.
  • वेगवेगळ्या ऋतूंचा विचार करुन गणवेश डिझाइन करण्यात आले आहे.
  • जेणेकरुन हिवाळ्यासह,उन्हाळ्यातही जवानांचे संरक्षण करेल.
  • केमोफ्लॅश म्हणजेच या जवानांवर शत्रूची नजर पटकन न जाण्याकरीता अशापद्धतीचा ड्रेस तयार करण्यात आला आहे. ऑलिव्ह आणि मातकट अशा रंगाचा असणार आहे.
  • जवानांना ज्या क्षेत्रात तैनात करण्यात येत आहे तेथील हवामानाचा विचार करुन गणेवेश तयार करण्यात आला आहे.

आतापर्यंत तीन वेळी भारतीय लष्कराचा गणेवेश बदलण्यात आला आहे.भारताला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर, भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांचा गणवेश वेगळा असावा याकरीता गणवेशात बदल करण्यात आले.त्यानंतर साल 1980 मध्ये गणवेशात बदल करुन,त्या गणवेशास बॅटल ड्रेस असे नाव दिले.त्यानंतर या गणवेशात 2005 मध्ये बदल करण्यात आला.
सरकारने CRPF आणि BSF च्या गणवेशासाठी आर्मी डीपी बॅटल ड्रेस वेगळा असण्याकरीता गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Punjab Elections 2022: चन्नींचे पंजाबवासीयांना इलेक्शन पॅकेज, विजेच्या दरात प्रति युनिट ३ रुपयांची सूट


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -