घरदेश-विदेशएलओसीवर गोळीबार; जवानांकडून पाकिस्तानी सैन्यांच्या ५ चौक्या उध्वस्त

एलओसीवर गोळीबार; जवानांकडून पाकिस्तानी सैन्यांच्या ५ चौक्या उध्वस्त

Subscribe

पाकिस्तानी सैन्य एलओसीवरील रहिवासी वस्तीमध्ये लपून हल्ले करत आहे. याला भारतीय जवानांकडून चोखप्रत्युत्तर दिले जात आहे.

भारतीय सैन्यांनी पाकिस्तानमध्ये घूसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळ उध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनंतर खवळललेल्या पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. काल संध्याकाळपासून पाकिस्तानने १२ ते १५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले सुरु आहेत. पाकिस्तानी सैन्य एलओसीवरील रहिवासी वस्तीमध्ये लपून हल्ले करत आहे. याला भारतीय जवानांकडून चोखप्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तांकडून करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ल्यात ५ भारतीय जवान जखमी झाले आहेत. तर भारतीय सैन्यांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्यांच्या ५ चौकी उध्वस्त झाल्या आहेत. यामध्ये १० पाकिस्तानी सैन्य ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. तर २ पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत. एलओसीवर सध्या तणावाची परिस्थिती आहे.

- Advertisement -

१० पाकिस्तानी सैन्य ठार

मंगळवारी सांयकाळपासून पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मनजोत, नौशेरा, राजौरी, अखनूर, सियालकोट आणि पूँछ भागामध्ये पाकिस्तांकडून गोळीबार सुरु आहे. एका लष्कर अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय सैन्य देखील चौख प्रत्युत्तर देत आहे. भारतीय जवानांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानी सैन्यांच्या ५ चौक्या उध्वस्त झाल्या आहेत. राजौरी आणि पुँछ जिल्ह्यातील एलओसीजवळ पाकिस्तानी सैन्यांच्या चौक्या होत्या. यामध्ये पाकिस्तानचे १० सैन्य ठार झाल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

स्थानिकांच्या घरात लपून ग्रेनेड हल्ला

दरम्यान, पाकिस्तानी सैन्य एलओसीजवळील नागरिकांच्या घरात लपून ग्रेनेड हल्ले आणि गोळीबार करत आहे. त्यानंतर भारतीय सैन्यांनी नागरीवस्तीपासून दूर असलेल्या पाकिस्तानी सैन्यांच्या चौकीला लक्ष्य केले. यामध्ये मोठ्यासंख्येने पाकिस्तानी सैन्य ठार झाले. दोन्ही बाजूने सध्या गोळीबारी सुरु आहे. या गोळीबारामध्ये ५ भारतीय जवान जखमी झाले आहेत. यामधील दोन जवानांवर सैन्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -