Women In Indian Army: पहिल्यांदाच इंजिनिअरिंग क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदी प्रमोशन

Indian Army grants time scale colonel rank to five women officers
Women In Indian Army: पहिल्यांदाच इंजिनिअरिंग क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदी प्रमोशन

भारतीय संरक्षण सेवेमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने भारतीय सैन्याकडून सातत्याने पावले उचलली जात आहेत. भारतीय सैन्याच्या एका निवड आयोगाने रिकॉनेबल सर्व्हिसला २५ वूर्ष होण्यानिमित्ताने कर्नल पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला. पहिल्यांदाच इंजिनिअरिंग श्रेत्रातील पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदी प्रमोशन केले. कॉर्प्स ऑफ सिग्नल्स, कॉर्प्स ऑफल इलेक्ट्रोनिक्स अँड मॅकेनिकल इंजिनिअर्स आणि कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्समध्ये काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँकसाठी मंजूरी दिली आहे.

यापूर्वी महिला अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीला फक्त आर्मी मेडिकल कॉप्स, जज अॅडवॉकेट जनरल आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्स यांना होती. पण आता इंजिनिअरिंग क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदी पदोन्नती होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सैन्याच्या अधिक शाखांमध्ये पदोन्नतीचे मार्ग विस्तारणे हे महिला अधिकाऱ्यांसाठी या क्षेत्रात वाढत्या करिअरच्या संधीचे संकेत आहेत.

दरम्यान भारतीय सैन्याच्या बहुतांश शाखांमधून महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी कमिशन देण्याच्या निर्णयासोबत लष्करात लैंगिक समानता असल्याचे दिसून येते आहे.

आज पाच महिला अधिकाऱ्यांची कर्नल टाईम स्केलच्या रँकसाठी निवड केली आहे. त्यामध्ये कॉर्प्स ऑफ सिग्नल्समधून लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, कॉर्प्स ऑफ ईएमईकडून लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सकडून लेफ्टनंट कर्नल रीनू खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल ऋचा सागर यांची निवड करण्यात आली आहे.


हेही वाचा – लस घेऊनही वाढतोय कोरोनाच्या ‘ब्रेकथ्रू इंफोक्शन’चा धोका, प्रभावी लसीचा शोध सुरु