घरदेश-विदेशजम्मू काश्मीर : पाकने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन; राजौरीत भारतीय लष्कर अधिकारी शहीद

जम्मू काश्मीर : पाकने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन; राजौरीत भारतीय लष्कर अधिकारी शहीद

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) शहीद झाले आहेत. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचे समजते. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून पाकिस्तानी सैन्याकडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. बाबाखोरी परिसरात पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्करातील अधिकारी शहीद झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार

दहशतवाद्यांनी आज, सोमवारीच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) पथकावर हल्ला केला. त्यानंतर काही तासांनी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पुलवामा जिल्ह्यातील पंपोर येथील कंडाल परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. तर तीन जवान जखमी झाले. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा –

निर्भयाच्या बलात्काऱ्यांचे वकील लढवणार हाथरस प्रकरणातील आरोपींची बाजू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -