घरदेश-विदेशHow’s the josh? गिलगिट आणि बाल्टिस्तान ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज

How’s the josh? गिलगिट आणि बाल्टिस्तान ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज

Subscribe

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 27 ऑक्टोबर रोजी गिलगिट-बाल्टिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावर चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजला म्हणाले की, आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. जेव्हा कधी असा निर्णय होईल आणि आम्हाला आदेश दिले जातील, तेव्हा आम्ही त्याची पूर्तता करू. आम्ही आमची ऑपरेशनल तयारी आणि आमच्या मारक क्षमतेत सातत्याने सुधारणा करत आहोत. त्यामुळे जेव्हा कधी गरज पडेल, तेव्हा आम्ही मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये अनुच्छेद 370 हटविल्यापासून या प्रदेशांमध्ये विकासाची अनेक कामे जोमाने सुरू आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा मुद्दा सुद्धा मागील अनेक वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच 1994मध्ये भारतीय संसदेने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानातून पुन्हा भारतात घेण्यासंदर्भात ठराव मंजूर केला होता. पण तो अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही. याच संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 27 ऑक्टोबरला शौर्यदिनाचे औचित्य साधत एक मोठे वक्तव्य केले होते. पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे दुःख आम्ही समजू शकतो. पाकिस्तानकडून त्यांच्या सर्व हक्काचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीर व लडाख विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि ही केवळ सुरुवात आहे. पाकव्याप्त जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान भारतात समाविष्ट होईल आणि तो दिवस फार दूर नाही, असे संरक्षणमंत्री म्हणाले होते.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजला यांनी भारतीय सैन्याची सज्जता असल्याचे सांगितले. गेल्या 20 महिन्यांपासून सुरू असलेल्या शस्त्रसंधीचा फायदा झाला आहे. लष्कराने उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या आहेत. घुसखोरीविरोधी यंत्रणा मजबूत करण्यात आली आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. या वर्षात आतापर्यंत केवळ आठ दहशतवादी घुसखोरी करू शकले आहेत. त्यापैकी तिघांना यमसदनी पाठविण्याता आले आहे. गेल्या 32 वर्षांतील हे एकमेव वर्ष आहे की, ज्यात एवढ्या कमी संख्येने घुसखोरी झाली आहे, असे ते म्हणाले.

काश्मीर खोऱ्यातील सुधारत असलेली स्थिती पुन्हा बिघडवण्यासाठी सीमेपलीकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचे प्रयत्न झाले, ते आमच्या जवानांनी हाणून पाडले. आम्ही शत्रूला चोख प्रत्युत्तर देत आहोत, त्यांचे प्रत्येक डाव हाणून पाडत आहोत. आज काश्मीर खोऱ्यात परिस्थिती पूर्वपदावर येत असून केवळ लष्करामुळे हे साध्य होत नसून इतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस यांच्या सहकार्याने सर्वांगीण धोरण अवलंबण्यात आले आहे, त्यामुळेच हे शक्य होत आहे. त्यातही काश्मीरमधील जनतेची साथ आम्हाला मिळत आहे. आमच्या दहशतवादविरोधी मोहिमेची ती शक्ती बनली आहे, असे लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजला म्हणाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -