घरदेश-विदेशभारतीय लष्करांनी केला 'येती' हिममानवाच्या अस्तित्वाचा दावा

भारतीय लष्करांनी केला ‘येती’ हिममानवाच्या अस्तित्वाचा दावा

Subscribe

भारतीय लष्करांनी मेकावू बेस कॅम्पच्या जवळ एका महाकाय पायाच्या ठाशांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भारतीय लष्करांनी मेकावू बेस कॅम्पच्या जवळील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून मोठ्या चर्चेला उढाण आले आहे. हि चर्चा म्हणजे हिममानव प्रत्यक्षात अस्तिवात आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यारे फोटो भारतीय लष्करानी शेअर केले आहेत. भारतीय लष्कारांनी हिममानव ‘येती’च्या अस्तित्वाचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. लष्करांनी महाकाय पायांच्या ठशांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. तसेच हे फोटो शेअर केल्यावर हे पाय ‘येती’चे असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय लष्कराच्या ट्विटमध्ये

भारतीय लष्करांनी ट्विटर वर एका महाकाय पायाचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्या ट्विटमध्ये लिहिले असे लिहिले होते की, ‘मेकालू बेस कॅम्पच्या जवळ भारतीय लष्करातील एका गिर्यारोहक पथकाला अंदाजे ३२*१५ इंचाचे रहस्यमयी हिममानवाच्या पायचे ठसे सापडले आहेत. तसेच हा हिममानव ‘येती’ हा केवळ मेकालू बरुन नॅशनल पार्कमध्ये दिसला होता, असे भारतीय लष्करांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

‘येती’ हिममानव म्हणजे नेमके काय?

‘येती’ म्हणजे सृष्टीतील सर्वात महाकाय रहस्यमयी प्राण्यांमधील एक आहे. तसेच ‘येती’ला बऱ्याच वेळा बघितले असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तसेच शोधकर्त्यांनी असे म्हटले आहे की, हा हिममानव पोलर बियरच्या प्रजातीचा आहे. तसेच हि प्रजाती ४० वर्ष जुनी आहे. तसेच काही संशोधक असे म्हणतात की, ही एक अस्वलाची प्रजाती आहे, जी हिमालयामध्ये राहते. मात्र, कोणत्याच संशोधकांचे यासंबंधी एकमत झालेले नाही आहे की, नेमका ‘येती’ हिममानव काय आहे. ‘येती’ हा एक प्राचीन प्राणी आहे. नेपाल, लद्दाख आणि तिब्बत या हिमालयामध्ये राहतो असे सांगितले जाते. तसेच पौराणिक कथेच्या नुसार नेपालमध्ये ‘येती’ला रक्षक म्हणूनही संबोधले जाते.

- Advertisement -

कसा दिसतो ‘येती’?

‘येती’ हा एका सामान्या मानवापेक्षा उंच, अस्वला सारखा दिसतो. तसेच त्याचे पूर्ण शरिर केसांनी झाकलेल्या सारखे आहे. तसेच त्याच्या अंगाला एका वेगळ्याच प्रकारचा दुर्गंध येतो. तसेच तो खूप जास्त शक्तीशाली आहे. ‘येती’सा सर्वात पहिले १९२५ साली बघिले असल्याचा रिपोर्ट जर्मनच्या एका छायाचित्रकाराने दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -