गुजरात किनाऱ्यावर भारतीय तटरक्षक दलाने पकडली पाकिस्तानी बोट, १० संशयितांना अटक

गुजरात किनाऱ्यावर भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रातून पाकिस्तानच्या १० नागरिकांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी बोट यासीनमध्ये होती. ८ जानेवारी रोजी तटरक्षक दलाने कारवाई केली असता पाकिस्तानी बोट पकडण्यात आली. सर्व पाकिस्तानी नागरिकांना पोरबंदर येथे आणण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. २६ जानेवारीपूर्वी काही अनुचित घटना घडवून आणण्याची योजन आखत असल्याचं सांगितलं जात आहे.

सप्टेंबरमध्ये बोटीसह १२ संशयितांना अटक

पाकिस्तानी बोट पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात सुद्धा एक बोट पकडली होती. या बोटीत पाकिस्तानचे १२ क्रू मेंबर्स होते. गुजरातच्या सीमेजवळ घुसखोरांवर नजर ठेवण्यासाठी भारतीय तटरक्षक जहाज ‘राजरतन’ने सर्व्हिलांस मिशन दरम्यान पाकिस्तानी जहाज ‘अल्लाह पवाकल’ शोधले. त्यानंतर तटरक्षक दलाच्या जवानांनी या जहाजावर कब्जा केला होता.

७७ किलोचे हेरॉईन जप्त

पाकिस्तान समुद्राच्या मार्गाने भारतासह इतर देशांमध्ये सुद्धा ड्रग्ज पाठवण्याच्या तयारीत आहेत. मागील वर्षात भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करून अल हुसेनी ही पाकिस्तानी बोट भारतीय समुद्राच्या सीमेवर पकडण्यात आली होती. तसेच यावेळी चौकशी केली असता ७७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आली होती. यावेळी पाकिस्तानी बोटीसह ६ जणांना पकडण्यात आले होते.


हेही वाचा  : गोव्याच्या निवडणुकीत तृणमूल, आपच्या पैशांचे धनी कोण? संजय राऊतांचा सवाल