मुसळधार पावासाचा फायदा घेत पाकिस्तानी युद्धनौका घुसली भारतीय हद्दीत; गुजरात सीमेवरून हुसवण्यात यश

indian coast guard chases away pakistan navy warship

एकीकडे चीनकडून भारतातील हद्दीत घुसण्यास प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे भारताचा दुसरा शत्रू राष्ट्र पाकिस्ताननेही आपल्या कुरापती सुरु ठेवल्या आहेत. जुलै महिन्यात जेव्हा भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने थैमान घातले होते तेव्हा पाकिस्तानी युद्धनौकाने संधीचा घेत भारताच्या समुद्र हद्दीत घुसली होती.

ही पाक युद्धनौका गुजरातमधील भारतीय समुद्र क्षेत्रात घुसली. परंतु दक्ष असलेल्या भारतीय तटरक्षक दलाने सागरी सीमेवर टेहळणी करणाऱ्या डॉर्नियर विमानाच्या मदतीने या युद्धनौकेला हुसकावून लावले आहे. आलमगीर असे या पाकिस्तानी युद्ध नौकेचे नाव आहे.

पाकच्या आलमगीरने भारतीय समुद्र क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर लगेचच भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने तिचा शोध घेण्यात आला. यावेळी ते विमान जवळच्या विमानतळावरून सागरी निगराणीसाठी निघाले होते. पाकिस्तानी युद्धनौकेचा शोध घेतल्यानंतर डॉर्नियर विमानाने आपल्या कमांड सेंटरला भारतीय समुद्र क्षेत्रातील आपल्या उपस्थितीबाबत माहिती दिली, तसेच त्या युद्धनौकेवर लक्ष ठेवले.

सुत्रांच्या माहितीनुसार, डॉर्नियरने पाकिस्तानी युद्धनौकेला इशारा दिला व भारतीय हद्दीतून परत जाण्या सांगितले, परंतु पाकिस्तानी युद्धनौकेकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. यावेळी भारतीय डॉर्नियरने पीएनएस आलमगीरच्या पायलटशी रेडिओ संप्रेषणाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी पाकिस्तानी कप्तानने मौन पाळले, अखेर डॉर्नियर विमानाने आलमगीरवरून दोन ते तीन वेळा उड्डाण केले, यानंतर पाकिस्तानी युद्धनौका माघारी फिरली.

यापूर्वी देखील अनेक वेळा पाकिस्तानकडून भारतीय समुद्र हद्दीत खुसखोरी करण्याचे प्रयत्न झाले. यात पाकिस्तानातून समुद्रमार्गे भारतात ड्रग्स पुरवठ्याचे कटही अनेकदा भारतीय तटरक्षक दलाने उधळून लावले आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून सातत्याने भारतीय सीमा हद्दीत खुसण्याचे प्रयत्न भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून हाणून पाडले जात आहेत.


ईडी कोठडीतून राऊतांनी लेख कसा लिहिला?, मनसेचा ‘रोखठोक’ सवाल