घरताज्या घडामोडीCoronavirus: जगातील ४४ देशांमध्ये सापडला भारतामधील कोरोना व्हेरियंट - WHO

Coronavirus: जगातील ४४ देशांमध्ये सापडला भारतामधील कोरोना व्हेरियंट – WHO

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात विस्फोटक रुप धारण केले आहे. भारतात आढळलेला कोरोना व्हेरियंट जगातील अनेक देशांमध्ये सापडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी सांगितले की, ‘भारताची ज्या कोरोना व्हेरियंटमुळे परिस्थिती बिघडली आहे, तो व्हेरियंट जगातील अनेक देशांमध्ये आढळला आहे.’ संयुक्त राष्ट्राची आरोग्य संस्थेने सांगितले की, ‘भारतात कोरोनाचा B.1.617 व्हेरियंट गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आढळला होता. आता हा व्हेरिएंट WHO च्या सर्व ६ क्षेत्रांमधील ४४ देशात आढळला आहे.’

ब्रिटनमध्ये भारतीय कोरोना व्हेरियंटचा धुमाकूळ

भारतीय व्हेरियंट जगातील ४४ देशांमध्ये धुमाकूळ घालत असला तरी भारताबाहेर ब्रिटनमध्ये सर्वाधिक या व्हेरियंटचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातील WHOने B.1.617ची घोषणा केली. हा एक म्यूटेशन असून चिंतेच्या एका प्रकारमध्ये याला गणनले जाते. यामुळे पहिल्यांदा ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या तीन प्रकारांच्या यादीमध्ये याचा समावेश केला होता.

- Advertisement -

व्हायरसच्या मूळ रुपापेक्षा व्हेरियंटला अधिक धोकादायक म्हणून पाहिले जाते. कारण व्हेरियंट जास्त संक्रमित किंवा प्राणघातक असतात. WHOने बुधवारी सांगितले की, ‘B.1.617 यादीत समाविष्ट केले गेले आहे कारण कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा सहजतेने संक्रमित होत असल्याचे दिसत आहे.’

दरम्यान देशात गेल्या एक दोन दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून आली आहे. परंतु मृत्यूची संख्या अजूनही वाढत आहे. देशातील कोरोना मृत्यूच्या संख्येने आतापर्यंत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत आणि दिवसाला ४ हजार २०० मृत्यूची नोंद झाली आहे. पण आज मृत्यूच्या संख्येने नवा विक्रम केला आहे. गेल्या २४ तासांत देशात ४ हजार २०५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ लाख ४८ हजार ४२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३ लाख ५५ हजार ३३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: २ ते १८ वयोगटातील चाचण्यांसाठी Covaxin लस वापरा; तज्ज्ञांकडून शिफारस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -