घरदेश-विदेशAmit Shah : 'भारतीय संस्कृती आणि रामायण...'; अमित शहांचे लोकसभेत मोठे वक्तव्य

Amit Shah : ‘भारतीय संस्कृती आणि रामायण…’; अमित शहांचे लोकसभेत मोठे वक्तव्य

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत नियम 193 अंतर्गत ‘ऐतिहासिक श्री राम मंदिराचे बांधकाम आणि श्री रामलल्लाचा अभिषेक’ या विषयावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी आज कोणालाच उत्तर देणार नसल्याचे स्पष्ट करताना म्हटले की, मला माझे विचार आणि जनतेचे विचार आज देशासमोर मांडायचे आहेत. त्यामुळे 22 जानेवारी 2024 बद्दल काही लोक काय म्हणतात ते महत्त्वाचे नाही, तो दिवस दहा हजार वर्षांहून अधिक काळ ऐतिहासिक दिवस बनून राहील, असे अमित शहा म्हणाले. (Indian culture and Ramayana were not seen separately Amit Shah big speech in the Lok Sabha)

हेही वाचा – Amit Shah : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू होणार सीएए’; केंद्रीय गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

- Advertisement -

नियम 193 अंतर्गत चर्चेत बोलताना अमित शहा म्हणाले की, राम मंदिर अभिषेक सोहळा हा 1528 पासून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा आणि लढ्याच्या विजयाचा दिवस आहे. 22 जानेवारी 2024 हा संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक चेतनेच्या नवजागरणाचा दिवस आहे. राम आणि राम चारित्र्याशिवाय देशाची कल्पनाच करता येत नाही. राम आणि रामाचे चारित्र्य हा भारतातील लोकांचा आत्मा आहे. संविधानाच्या पहिल्या प्रतपासून महात्मा गांधींच्या आदर्श भारताच्या संकल्पनेपर्यंत रामाचे नाव वापरले जात राहिले, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

भारतीय संस्कृती आणि रामायण वेगळे पाहिले गेले नाही

अमित शहा म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि रामायण कधीही वेगळे पाहिले गेले नाही. अनेक भाषा, संस्कृती आणि धर्मांमध्ये रामायणाचा उल्लेख आहे. अनेक देशांनी रामायण स्वीकारले आहे आणि ते एक आदर्श ग्रंथ म्हणून मांडले आहे. त्यामुळे राम आणि रामायणापासून वेगळ्या देशाची कल्पना करणे अशक्य आहे. ही लढाई 1528 पासून लढली जात होती. अनेक दशके लढाई सुरू राहिली. त्यानंतर 1858 पासून कायदेशीर लढाई सुरू होती. 330 वर्षांनंतर आज कायदेशीर लढाई संपुष्टात आली आणि रामलल्ला त्यांच्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : “महाराष्ट्राचे गृहमंत्री मनोरुग्ण…”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर घणाघाती टीका

रामजन्मभूमीचा इतिहास मोठा

अमित शहा म्हणाले की, आंदोलनाबाबत अनभिज्ञ राहून देशाचा इतिहास वाचता येणार नाही. 1528 पासून, प्रत्येक पिढीने या चळवळीला वचन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात ते प्रत्यक्षात आले आणि स्वप्न साकार झाले. रामजन्मभूमीचा इतिहास मोठा आहे. या लढ्यात राजे, संत, निहंग, कायदेतज्ज्ञ यांचे योगदान आहे. आज या सर्व शूरवीरांचे विनम्र स्मरण करायचे आहे, असे अमित शहा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -