दुबईला जाणाऱ्यांसाठी भारतीयांकरिता आनंदाची बातमी आहे, असे म्हणता येईल. कारण आता दुबईतील विमानस्थळावर होणारे व्यवहार भारतीय चलन रुपयांमध्ये करता येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतील प्रमुख दैनिक ‘गल्फ न्यूज’ ने हे वृत्त दिले आहे. भारतीय चलन हे आता दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अल मख्तोम एअरपोर्टवरील तिन्ही टर्मिनल्सवर स्वीकारले जाईल. आम्ही भारतीय रूपया स्वीकारायला सुरवात केली आहे, असे ‘दुबई ड्युटी फ्री’ च्या कर्मचाऱ्याने सांगितले आहे.
पर्यटकांना होणार फायदा
या निर्णयामुळे भारतीय पर्यटकांना सर्वात मोठा फायदा होणार असून यापुढे भारतात येणाऱ्या नागरिकांना तसेच पर्यटकांना यांचा मोठा फायदा होणार आहे. याआधी त्यांना चलन आदला-बदली करत असताना मोठी किंमत चुकवावी लागत होती.
गेल्या वर्षी १२.२ दशलक्ष भारतीय प्रवाशांचा समावेश
‘गल्फ न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी दुबई विमानतळांवर जवळपास ९० दशलक्ष प्रवासी आले होते. त्यातील १२.२ दशलक्ष भारतीय प्रवाशांचा समावेश होते. दुबईतील ड्युटी फ्री शॉपमध्ये भारतीयांना खरेदी करायची असायची तेव्हा त्यांना रूपया डॉलर, दिरहॅम किंवा युरोमध्ये पैसे द्यावे लागत होते, मात्र या निर्णयानंतर विमानतळावर स्वीकारले जाणारे भारतीय रुपया हे १६ वे विदेशी चलन ठरले आहे.