Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Q2 GDP Data: जागतिक आव्हानांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा, जीडीपी दुसऱ्या तिमाहीत...

Q2 GDP Data: जागतिक आव्हानांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा, जीडीपी दुसऱ्या तिमाहीत ६.३ टक्क्यांच्या वर

Subscribe

जागतिक मंदी आणि वाढत्या महागाईच्या भीतीने भारतीय अर्थव्यवस्थेने आपला वेग कायम ठेवला आहे. सप्टेंबरमध्ये तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले होते. अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ६.३ टक्के दराने वाढली आहे. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ६.३ टक्के इतका होता.

वास्तविक चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जून-2022 मध्ये जीडीपीचा आकडा 13.5 टक्के होता. त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत, जीडीपीची वाढ 8.4 टक्के होती. सप्टेंबरमध्ये तिमाहीचे आकडे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत देत आहेत.

- Advertisement -

जगातील विकसित अर्थव्यवस्था संकटांनी ग्रासलेल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थेने ही आकडेवारी दिली आहे. जगातील विकसित अर्थव्यवस्था संकटांनी ग्रासलेल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थेने ही आकडेवारी दिली आहे. ब्रिटन आर्थिक मंदीत अडकले आहे. चीनने आपली जीडीपीची ताजी आकडेवारी जाहीर केलेली नाही, कारण नकारात्मक वाढीचा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेत महागाईने जनता हैराण झाली आहे. ही आकडेवारी आरबीआयच्या अंदाजानुसार आहे.

जागतिक अर्थव्यवस्था सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. मंदी आणि महागाईचा प्रश्न कायम आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा जगभरात आर्थिकदृष्ट्या परिणाम झाला आहे. पुरवठा साखळीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, महागाई शिगेला पोहोचली आहे अमेरिकेत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात सातत्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला जात आहे.


- Advertisement -

हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -