घरदेश-विदेशIndian Ex Navy Officers Released : भारतीय मुत्सद्देगिरी ठरली यशस्वी; कतारच्या तुरुंगातील...

Indian Ex Navy Officers Released : भारतीय मुत्सद्देगिरी ठरली यशस्वी; कतारच्या तुरुंगातील माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका

Subscribe

नवी दिल्ली : भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांनी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवत कतारमधील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात भारताने दाखवलेल्या मुत्सद्देगिरीमुळे या आठही अधिकाऱ्यांची सुटका झाली असून त्यातील सात जण मायदेशी परतले आहेत.

हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. याआधी या प्रकरणात भारताने कतारसोबत राजनैतिक पातळीवर चर्चा करत आठ जणांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा कमी केली होती. त्यानंतर त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

- Advertisement -

या माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केल्यानंतर राजकीयदृष्ट्या शक्य असतील ते सगळे प्रयत्न करून त्यांना परत आणण्यासाठी कायदेशीर मदत केली जाईल, असं आश्वासन परराष्ट्र मंत्रालयानं दिलं होतं. हे आश्वासन पाळत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या आठ अधिकाऱ्यांची आधी फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. आणि नांतर त्यांची सुटका झाली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

भारताच्या या माजी नौसैनिकांची मुक्तता करण्याच्या कतारच्या निर्णयाचं भारत सरकारने स्वागत केलं आहे. या भारतीय नागरिकांची मुक्तता करण्याच्या आणि मायदेशी परत पाठवण्याच्या निर्णयाबाबत कतारच्या अमिर यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो, असं भारत सरकारने म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कतारमधील तुरुंगात बंद असलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांना न्यायालयाने हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेला आव्हान देण्यात आले असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. या माजी नौदल अधिकाऱ्यांना २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. तसेच ते ऑक्टोबर २०२२ पासून तुरुंगात बंद होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -