पहिल्याच दिवशी IT मंत्री अश्विनी वैष्णव यांचा Twitterला इशारा; म्हणाले, ‘देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल’

Indian IT Minister Ashwini Vaishnaw warns Twitter, says 'law of land supreme'
पहिल्याच दिवशी IT मंत्री अश्विनी वैष्णव यांचा Twitterला इशारा; म्हणाले, 'देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल'

नोकरशहा ते नेते झालेले अश्विनी वैष्णव यांनी आज, गुरुवारी माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्रालयाचा पदभार स्विकारला. तसेच त्यांनी रेल्वेमंत्री पदाचा देखील पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी आयटी नियमांबाबत ट्विटरला इशारा दिला आहे. ट्विटरच्या मनमानीवर माध्यमाच्या प्रश्नांना उत्तर देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘देशाचा कायदा सर्वांसाठी समान आहे आणि प्रत्येकाला त्याचे पालन करावेच लागेल.’

यादरम्यान ट्विटरने आज दिल्ली हायकोर्टाला सांगितले की, ‘आठ आठवड्यात ते तक्रार अधिकारी नियुक्त करतील.’ ट्विटरने कोर्टाला असे पण सांगितले की, ‘आयटी नियमांचे पालन करण्याकरिता भारतात एक संपर्क कार्यालयाची स्थापना करण्याच्या प्रक्रियेत आहे. हे त्यांचे कार्यालय कायम स्वरुपी असणार आहे.’

अश्विनी वैष्णव यांच्या संसदीय सदस्य म्हणून पहिलाच कार्याकाळ आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळात ते माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्रालय, दूरसंचार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय प्रभारी असतील. अश्विनी वैष्णव यांनी भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसार आणि पियुष गोयल यांनी जागा घेतली आहे. अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्विकारल्यानंतर पत्रकारांना म्हटले की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. त्यांनी मला देशाची सेवा करण्याची उत्तम संधी दिली. दूरसंचार, आयटी आणि रेल्वे या तिघांमध्ये बऱ्याच ताळमेळ आहे. त्यांचे व्हिजन पूर्ण होण्यासाठी मी काम करेन.’ 


हेही वाचा – प्रसारमाध्यमांशी १५ ऑगस्टपर्यंत जास्त बोलू नका, पहील्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी टोचले मंत्र्याचे कान