घरCORONA UPDATEभारतात कोरोना तिसऱ्या स्टेजमध्ये पोहचण्याची शक्यता वाढली

भारतात कोरोना तिसऱ्या स्टेजमध्ये पोहचण्याची शक्यता वाढली

Subscribe

भारतातील काही भागांमध्ये कोरोनाचा समुह संसर्ग वाढत असल्याने भारत कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजमध्ये पोहचण्याची शक्यता वाढली आहे. तबलीगी जमातीच्या लोकांमुळे देशभरात कोरोनाचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आयसीएमआर लवकरच नवीन मार्गदर्शक नियमावली जाहीर करणार आहे.

यासाठी कोरोनाचे रुग्ण ज्या परिसरात आढळतील तेथे कोरोना टेस्ट सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात उद्या शुक्रवारी आयसीएमआर मार्गदर्शक सूचनावली जाहीर करणार आहे. कोरोना विरुद्धच्या या लढाईत नव्या रणनीतीनुसार सरकार ज्या ज्या परिसरात समुह संसर्गाची शक्यता आहे अशा ठिकाणी घराघरात जाऊन लोकांशी संपर्क करणार आहे. येथे कोरोना सदृश्य लक्षण असलेल्या व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव किती प्रमाणावर झाला आहे हे स्पष्ट होणार आहे. अशी माहिती आयसीएमआरचे डॉक्टर रमन गंगाखेडकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

ल़ॉकडाऊनच्या एक आठवड्यानंतर कोरोना हॉटस्पॉटच्या रुपात समोर आला आहे. यात मुंबई व दिल्लीतील काही ठिकाणांचा समावेश असून रोज येथे मोठ्या संख्येने कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यांना क्वारनटाईन जरी करण्यात येत असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून हे लोकं मुक्तपणे सगळीकडे फिरत होते. यामुळे कोरोनाचा समुह संसर्गाचा धोका वाढला आहे.

लॉकडाऊनमुळे लोक रोज जरी लांबचा प्रवास करत नसले तरी रोजच्या वस्तू घेण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे त्यांच्या नकळत समूह संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. ही कोरोनाची तिसरी स्टेज असून याच स्टेजमध्ये कोरोनाचे कहर सुरू होतो. यामुळे कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट असलेल्या भागांना सील करणे गरजेचे झाले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे आवश्यक असले तरी समुह संसर्गाचा धोका आहे असेही आयसीएमआरने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -