Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नरेंद्र मोदीच कोरोनाचे 'सुपर स्प्रेडर', इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षाचा आरोप

नरेंद्र मोदीच कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षाचा आरोप

Related Story

- Advertisement -

इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ नवज्योत दहीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच कोरोना व्हायरचा सुपर स्प्रेडर म्हणून संबोधले आहे. देशभरात निवडणुका असणाऱ्या राज्यांमध्ये सभा, रॅली घेणे तसेच भाविकांना कुंभ मेळ्यात जाण्यासाठी परवानगी देणे यामुळेच कोरोनाच्या महामारीच्या संकटात दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने भर पडल्याचा आरोप त्यांनी केला. जेव्हा संपुर्ण वैद्यकीय क्षेत्राकडून जनतेला कोरोनाची नियमावली सांगण्यासाठी मेहनत घेण्यात येत आहे, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र मोठ्या सभा घेण्याचे मोठे धाडस केले. तसेच कोरोनाचे सर्वच नियम पायदळी तुटवड त्यांच्या सभानांही मोठी गर्दी उसळल्याचे दहीया यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा पहिला रूग्ण हा भारतात जानेवारी २०२० रोजी सापडला. पण कोरोनाच्या महामारीचे संकट पाहता आरोग्य यंत्रणेच्या सुविधा निर्माण करण्याएवजी गुजरातमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लाखो लोकांना एकत्र जमवण्याचे धाडस त्यांनी केले. पण जेव्हा कोरोनाची दुसरी लाट संसर्गाच्या पीक अव्हरमध्ये आहे, तेव्हा पंतप्रधानांनी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वर्षभरात कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसारमाध्यमांनी नरेंद्र मोदी कोरोनाची महामारी हाताळण्यात अपयशी ठरल्याचे वृत्तांकन केले आहे.

- Advertisement -

देशात ऑक्सिजनचा तुटवडा हेच सर्वात मोठे कारण कोरोना मृत्यूंमध्ये मोठी वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे. त्यामुळेच देशातील अनेकांना आपले प्राण या कोरोनाच्या संकटात गमावण्याची वेळ आली असे दहीया यांनी स्पष्ट केले. ऑक्सिजन प्लॅंट उभारणीसाठीचे अनेक प्रकल्प हे अद्यापही केंद्र सरकारच्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. पण या प्रकल्पांना तातडीने परवानगी देण्यासाठी मोदी सरकारला कोणतेही स्वारस्य नसल्याची टीका त्यांनी केली आहे. रूग्णांना घेऊन हॉस्पिटलबाहेर लागलेल्या रांगा, स्मशानाबाहेर अंत्यविधीसाठी लागलेल्या रांगा हे चित्र भारतातील प्रत्येक शहरामध्ये आहे. भारतात शेतकऱ्यांकडून झालेल्या नव्या कायद्याविरोधातील आंदोलनाला हाताळण्यातही मोदींना अपयशच आल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याएवजी त्यांची गर्दी जमू दिली. परिणामी कोरोनाचे संक्रमण वाढल्याचा ठपका त्यांनी मोदींवर ठेवला आहे. योग गुरू रामदेव यांच्या कोरोनील औषधाला पाठिंबा देण्यावरही आयएएने टीका केली आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी पुराव्यावर आधारीत औषध असल्याच्या दाव्याला सरकारने पाठिंबा देणे आणि जागतिक आरोग्य संघटनेने फटकारल्यानंतर सरकारवर नामुष्की ओढावणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी रामदेव यांनी आपल्या कोरोनीलच्या औषधाला परवाना मिळाला असून १५० देशांमध्ये वितरणासाठी परवानगी मिळाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. पण WHO च्या खुलाशानंतर त्यांचा दावा फोल ठरल्याचे समोर आले.


 

- Advertisement -