घरताज्या घडामोडीIMD : भारतात वर्ष २०२१ ची नोंद गेल्या १२० वर्षातील सर्वाधिक उष्ण...

IMD : भारतात वर्ष २०२१ ची नोंद गेल्या १२० वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्षांमध्ये

Subscribe

आयएमडीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सरासरी तापमानात सरासरीपेक्षा ०.४४ डिग्री सेल्सिअस इतक्या अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या २०२१ वर्षामध्ये पूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि भूस्खलन, वीज कोसळणे यासारख्या घटनांमध्ये वर्षभरात एकुण १७५० लोकांचा मृत्यू झाला. या वर्षात ४४ डिग्री सेल्सिअस इतक्या सर्वाधिक अशा तापमानाची नोंद झाली.

भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज स्पष्ट केले की वर्ष २०२१ हे गेल्या १२० वर्षांमधील सर्वाधिक उष्ण तापमानाचे असे पाचवे वर्ष होते. आयएमडीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सरासरी तापमानात सरासरीपेक्षा ०.४४ डिग्री सेल्सिअस इतक्या अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या २०२१ वर्षामध्ये पूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि भूस्खलन, वीज कोसळणे यासारख्या घटनांमध्ये वर्षभरात एकुण १७५० लोकांचा मृत्यू झाला. या वर्षात ४४ डिग्री सेल्सिअस इतक्या सर्वाधिक अशा तापमानाची नोंद झाली. (Indian Meteorological Department report year 2021 fifth hottest year in last 120 years in country)

- Advertisement -

हवामान विभागाने वार्षिक हवामान अहवाल २०२१ मध्ये स्पष्ट केले की, १९०१ पासून वर्ष २०२१ हे याआधीच्या देशातील २०१६,२००९, २०१७ आणि २०१० या वर्षातील सर्वाधिक तापमानाचे असे पाचवे उष्णतेचे वर्ष होते. देशातील सरासरी वार्षिक तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ०.४४ डिग्री सेल्सियस अधिक नोंदवण्यात आले. त्यामध्ये थंडी आणि मॉन्सून यासोबतच उष्णतेच्या वाढीमुळे हे वर्ष उकाड्याचे नोंदवले गेल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये देशात सरासरी तापमान हे वार्षिक तापमानापेक्षा ०.७१ डिग्री सेल्सियस अधिक होते. वर्ष २००९ आणि २०१७ मध्ये सरासरी तापमान हे क्रमशः ०.५५ डिग्री सेल्सियस आणि ०.५४ डिग्री सेल्सियस अधिक होते. २०१० मध्ये सरासरी वार्षिक तापमान हे ०.५३ राहिले होते.

- Advertisement -

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार भारतात चक्रीवादळ आणि वीज अंगावर कोसळल्याने २०२१ मध्ये ७८१ लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. तर अतिवृष्टीमुळे तसेच पूराच्या घटनांमुळे ७५९ लोकांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १७२ लोकांचा चक्री वादळामुळे मृत्यू झाला. तर हवामानाशी संबंधित इतर घटनांमुळे ३२ लोकांचा मृत्यू झाल्याचा आकडा हवामान विभागाने जाहीर केला.

४४.६ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद

गेल्या १२१ वर्षांमध्ये यंदाचा मार्च हा तिसरा सर्वाधिक उष्ण तापमानाचा मार्च महिना होता. गेल्या १२१ वर्षांमध्ये मार्च महिन्याची नोंद ही तिसऱ्या उष्ण महिन्यात झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार ३१ मार्चला ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या मैदानी क्षेत्रात, तटीय आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या काही ठिकाणी उष्ण तापमानाची नोंद होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार ओरिसाच्या बारीपाडा येथे सर्वाधिक तापमानाची ४४.६ डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -