घरताज्या घडामोडीCDS बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, रावत गंभीर जखमी, १३ जणांचा मृत्यू

CDS बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, रावत गंभीर जखमी, १३ जणांचा मृत्यू

Subscribe

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपीन रावत सपत्नीक मधुलिका रावत प्रवास करत होत्या. त्यांच्यासोबत लष्कराचे मोठे अधिकारीही असे मिळून १४ जणं प्रवास करत होते. दरम्यान यातील तीन जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. तर बिपीन रावत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवली जात असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या अपघाताची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. थोड्याच वेळापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बिपीन रावत यांच्या घरी पोहोचले. रावत यांच्या दिल्ली नजीग घराजवळ बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती ही गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी या परिसरात ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात तातडीने बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. परंतु हे हेलिकॉप्टर नेमकं दुर्घटनाग्रस्त कसं झालं. याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाहीये.

दरम्यान, भारतीय वायुसेनेने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बिपीन रावत यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुभाष भामरे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.

दिल्लीला परतत असताना कुन्नुरला पोहोचण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. बिपीन रावत यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची तब्येत स्थिर आहे.

दिल्लीच्या लष्करी तळावरून हेलिकॉप्टर कुन्नूरच्या दिशेने निघाले होते. यात रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि लष्करी अधिकारी असे १४ जणं होते. मात्र दुपारी १२.४० वाजता हे हेलिकॉप्टर  कोसळले. दरम्यान हेलिकॉप्टर तिथे कोसळले जिथे कोसळले तिथे घनदाट जंगल परिसर असल्याने बचावकार्य अडथळे येत होते. मात्र स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना यातील तिघांना वाचवण्यात यश मिळाले. तर चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते?

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, मधुलिका रावत (बिपीन रावत यांच्या पत्नी), ब्रिगेडियर एल.एस.लिड्डर, लेफ्टनंट हरजिंदर सिंह, नाईक गुरसेवक सिंह आणि जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार आणि बी साई तेजा, हवालदार सतपाल असे एकूण नऊ जण हेलिकॉप्टरमध्ये होते.

कोण आहेत बिपीन रावत ?

बिपिन रावत हे देशातील पहीले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असून हवाई दल,लष्कर आणि नौदल या तिन्ही दलात समन्वय साधणे हे त्यांचे काम आहे. २०१९ मध्ये त्यांनी चीफ ऑफ डिफेन्सचा पदभार हातात घेतला आहे.

बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. रावत यांना देशप्रमाचे बाळकडू त्यांच्या घरातून मिळाले. त्याचे वडील एलएस रावत हे लष्करात लेफ्टनंट जनरल होते. कडकशिस्तीबरोबरच अचूक धडाकेबाज निर्णय ही रावत यांची जमेची बाजू आहे. अनेकवेळा त्यांनी चीन आणि पाकिस्तानला खडे बोलही सुनावले असून अॅक्शनही घेतल्या. यामुळे चीन आणि पाकिस्तानही रावत यांच्यापासून सावध राहतात. बिपिन रावत यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आले आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -