भारतीय सागरी सीमेचे संरक्षण महिलांच्या खाद्यांवर, नौदलाची विशेष मोहीम यशस्वी

बुधवारी नौदलातील महिला वैमानिक आणि अधिकाऱ्यांनी ही मोहीम स्वतंत्रपणे राबवून एक नवा इतिहास रचला. गुजरातच्या पोरंदबर येथे ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली.

Indian Navy’s All Woman Aircrew Completes Maritime Mission

भारताचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. आजपर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सागरी सीमा संरक्षणाची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांनी यशस्वी पार पाडली. भारताच्या तिन्ही बाजूला विस्तीर्ण सागरी किनारा आहे. या सागरी सीमेवर लक्ष ठेवणे आणि सुरक्षा करणे ही जबाबदारी भारतीय नौदलाची असते. सुरक्षेसाठी रोज टेहळणी मोहीम राबवली जाते. बुधवारी नौदलातील महिला वैमानिक आणि अधिकाऱ्यांनी ही मोहीम स्वतंत्रपणे राबवून एक नवा इतिहास रचला. गुजरातच्या पोरंदबर येथे ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली. (Indian naval women pilot completing the first all women independent maritime reconnaissance and surveillance mission)

हेही वाचा – चीनने डागली 11 डोंगफेंग क्षेपणास्त्रे, जपानमध्ये पडल्याने दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण

गेल्या काही वर्षांपासून भारतीय नौदल सशस्त्र दलांमध्ये महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा टेहळणी मोहीम राबवण्यात आली. पोरबंदर येथील नौदलाच्या नेव्हल एअर एन्क्लेव्ह INAS 314 च्या पाच महिला अधिकाऱ्यांचा या मोहिमेत समावेश होता. या पाच महिला अधिकाऱ्यांनी बुधवारी डॉर्नियर २२८ विमानातून उड्डाण करत उत्तर अरबी समुद्रात टेहळणी आणि देखरेख मोहीम केली. या पथकात सर्व महिल्याच होत्या. तसेच, अशाप्रकारे स्वतंत्रपणे राबवण्यात आलेली ही महिलांची पहिलीच मोहीम होती. लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा या मोहिमेच्या प्रमुख होत्या. तर, वैमानिक लेफ्टनंट शिवांगी आणि लेफ्टनंट अपूर्वा गिते, टॅक्टिकल अँड सेन्सर अधिकारी लेफ्टनंट पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत होत्या.

हेही वाचा– ‘या’ कंपनीने 200 कर्मचाऱ्यांची एक झटक्यात केली हकालपट्टी; सांगितले हे मोठं कारण

 मोहिमेसाठी पूर्वतयारी

भारतीय सागरी सीमा देखरेख आणि सुरक्षा मोहिमेसाठी महिला अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून ही तयारी सुरू होती. नोदलाच्या केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.

…आणि इतिहास रचला

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनीही नियोजनपूर्व मोहीम राबवली. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. फक्त महिलांच्या पथकांनी ही मोहीम याआधी केली नव्हती. केवळ पुरुषच या मोहिमेचे नेतृत्व करत असत. मात्र, महिलांनीही आता ही जबाबदारी पार पाडली आहे.

हेही वाचा – पुढील दोन वर्षांत भारतात अमेरिकेसारखे रस्ते बनवू, नितीन गडकरींचे आश्वासन

टेहळणी मोहीम कशी असते?

भारताच्या विस्तीर्ण अशा सागरी किनाऱ्याची सुरक्षा करणे अति जिकरीचे काम आहे. यासाठी नौदल आणि तटरक्षक दल संयुक्तपणे मोहीम राबवत असतात. टेहळणी मोहिमेत नौदलाची डोंनिअर विमाने अवकाशातून लक्ष ठेवतात तर, आधुनिक यंत्रांच्या माध्यमातून भारतीय हद्दीत संशयित असणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवले जाते.