घरदेश-विदेशभारतीय लष्करात आता दिसणार महिला कमांडो; भारतीय नौदलाचा मोठा निर्णय

भारतीय लष्करात आता दिसणार महिला कमांडो; भारतीय नौदलाचा मोठा निर्णय

Subscribe

भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच आता महिलांना कमांडो होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरचं याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये महिलांचा समावेश करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. यात महिलांना पहिल्यांचा लष्कराच्या कोणत्याही भागात कमांडो म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र लवकरचं ही ऐतिहासिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

लष्करात दिसणार आता महिला कमांडो

लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये काही विशेष कमांडोंचा समावेश आहे, ज्यांना कठोर प्रशिक्षण दिलं जाते. या कमांडोंवर विशेष आणि गुप्त ऑपरेशन्स करण्याची जबाबदारी असते. या कामात स्पेशल फोर्स कमांडो पारंगत असतात. आता ज्या महिला प्रशिक्षणानंतर हे निकष पूर्ण करतील त्यांना नौदलात मरीन कमांडो होण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी कमांडोसाठी फक्त पुरुषांनाच परवानगी होती. पण आता भारतीय नौदलात महिलांनाही कमांडो होण्याची संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

महिलांना मार्कोस (MARCOS) होण्याची संधी

सुत्रांच्या माहितीनुसार, प्रशिक्षणानंतर महिलांनी निकष पूर्ण केल्यास त्यांना नौदलात मरीन कमांडो ( Marine Commandos) म्हणजे मार्कोस (MARCOS) होण्याची संधी मिळेल. भारताच्या लष्करी इतिहासातील एक ऐतिहासिक पाऊल आहे. परंतु कोणालाही थेट विशेष दलात सामील केले जाणार नाही. आधी महिला कमांडोंना स्वयंसेवक म्हणून काम करावं लागेल.

दरम्यान पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीअंतर्गत भारतीय नौदलात सामील होणाऱ्या महिला अधिकारी (Officer) आणि नाविक (Sailors) यांना मार्कोस (MARCOS) प्रशिक्षणासाठी परवानगी दिली जाईल.


RSS देशातील प्रत्येक गावात उघडणार शाखा; मोहन भागवतांचा नेमका प्लॅन काय?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -