छत्रपती शिवरायांचे स्मरण करत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नव्या ध्वज चिन्हाचे अनावरण

Indian navy got a new ensign the desing is taken from the seal of chhatrapati shivaji maharaj

भारतीय नौदलाला अखेर गुलामगिरीतून मुक्तता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नवीन ध्वज चिन्हाचे अनावरण केले आहे. नौदलाचे हे नवे ध्वज चिन्ह पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केले आहे. शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. यावेळी भारतीय नौदलातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे मोदींकडून स्मरण करण्यात आले. भारतीय नौदलच्या या नव्या चिन्हावर शं नो वरुण; असं संस्कृत बोधवाक्य लिहिलं आहे. याचवेळी पीएम मोदींनी INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून नौदलाचे ध्वजारोहण

यावेळी पीएम मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलातील कार्याचा उल्लेख करत म्हटले की, भारताने आपल्या मनातून गुलामीची खूण काढून टाकली आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची खूण होती. मात्र यापुढे नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे प्रतीक फडकणार आहे. आज मी नवा ध्वज नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करतो.

पीएम मोदींनी अलीकडेच 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की, वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त भारताचे स्वप्न पाहत आहेत. त्याच वेळी स्वप्न प्रत्यक्षात रूपांतरित होताना दिसत आहे. कोची येथे पंतप्रधान मोदी मोदी नवीन चिन्हाचे अनावरण करण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, पण आजही अनेक गोष्टींवर गुलामगिरीच्या दिवसांची छाप दिसत आहे. मोदी सरकार हा छाप पुसण्याचा प्रयत्न करत आहे. असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, ब्रिटिश संसदेत कायदा करून भारतीय जहाजे आणि व्यापार्‍यांवर किती कठोर निर्बंध लादले गेले, याचा इतिहास साक्षीदार आहे. त्यांनी भारताच्या सागरी शक्तीचे कंबरडे मोडायचे ठरवले. पण छत्रपती वीर शिवाजी महाराजांनी सागरी शक्तीच्या बळावर अशी नौदल उभारली, ज्याने शत्रूंची झोप उडवली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणारा व्यापाराचा धाक होता.

चिन्हामध्ये नेमका काय बदल केला?

देशाच्या स्वातंत्र्यानंतरही भारतीय सैन्याने ब्रिटीश वसाहतवादी ध्वज आणि चिन्हांचा वापरणे सुरू ठेवला होता. 26 जानेवारी 1950 रोजी ध्वजाचा नमुना बदलून केवळ भारतीयकृत करण्यात आला. ध्वजातील युनियन जॅकला तिरंग्यात बदलण्यात आले. यातील जॉर्ज क्रॉस सरळ सोडला गेला होता. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या नवीन नौदल ध्वजाच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात राष्ट्रीय ध्वज तिरंग्यासह असलेला सेंट जॉर्ज क्रॉस हटवला आहे. त्याजागी उजवीकडे मध्यभागी नेव्हल क्रेस्ट ठेवण्यात आला आहे.

नौदलाच्या जुन्या ध्वजातील जॉर्ज क्रॉस हा भारतीय नौदलाच्या स्वातंत्र्यपूर्व ध्वजाच्या संकल्पनेपासून प्रेरित वसाहती भूतकाळ प्रतिबिंबित करतो. जुन्या ध्वजाच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात युनायटेड किंगडमचा युनियन जॅक असलेला पांढऱ्या रंगावर लाल जॉर्ज क्रॉस होता, जो आता बदलण्यात आला आहे.