नवी दिल्ली: भारताच्या नावाबाबत सध्या देश वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. G-20 बैठकीसाठी राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निमंत्रण पत्रात ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिल्यानंतर विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. ते म्हणतात की सरकार देशाचे नाव बदलणार आहे. विरोधकांनी आपल्या युतीचं नाव ‘इंडिया’ ठेवलं आहे. अशातच आता भारतीय नौदलाच्या जवानांना पारंपरिक भारतीय पोशाख घालण्याची परवानगी दिली जाणार आहे. यावर सध्या चर्चा सुरू आहे. ड्रेसकोड लागू झाल्यास सैनिक आणि अधिकारी जेवणाच्या खोलीत आणि वॉर्डरूममध्ये भारतीय पोशाखात दिसतील. आतापर्यंत लष्करात भारतीय कपडे घालण्याची परवानगी नव्हती. (Indian Navy Navy soldiers now seen in traditional attire like Kurta Payjama This will be the new dress code )Indian Navy Navy soldiers now seen in traditional attire like Kurta Payjama This will be the new dress code
नुकतंच तीन दिवसीय नौदल परिषद राबवण्यात आली होती. यासोबतच राष्ट्रीय नागरी पोशाखाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्यासमोर कुर्ता पायजमा, फॉर्मल वेस्टकोट, चुरीदार पायजमा आणि गलबँड सूटसह पोशाख प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र, या पोशाखांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. हा मुद्दा निश्चितच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमोर विचाराधीन आहे.
ब्रिटिशांच्या काळापासून सैन्यात भारतीय कपडे घालण्यास परवानगी नाही. सैनिकांसोबतच तिथे आलेले पाहुणेदेखील आर्मी कॅन्टीनमध्ये भारतीय पोशाख घालून जाऊ शकत नाही. त्यावरही बंदी आहे. पाश्चात्य संस्कृती हटवण्यात नौदल आघाडीवर असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले होते की, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून पाच प्राणदलांचा उल्लेख केला होता. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याचाही यात समावेश होता. पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या स्वदेशी ध्वजाचेही अनावरण केले, ज्यावरून लाल सेंट जॉर्ज क्रॉस काढण्यात आला होता. गेल्या वर्षी आयएनएस विक्रांतच्या कार्यान्वित झाल्याच्या निमित्ताने हे करण्यात आले होते.
(हेही वाचा: संसदेच्या विशेष अधिवेशनावरून सोनिया गांधीचं पंतप्रधानांना पत्र; ‘या’ मुद्द्यावर वेधलं लक्ष )
इंडिया की भारत वादंग
दिल्लीतील प्रगती मैदानावर ९ ते १० सप्टेंबर दरम्यान जी-२० शिखर परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होणार्या जागतिक नेत्यांसाठी राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबर रोजी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या वतीने देण्यात येणार्या डिनरला उपस्थित राहण्यासाठी पाहुण्यांना राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे.
या निमंत्रण पत्रिकेत परंपरेला बगल देत ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आले आहे. यावरून नव्या वादाला खतपाणी मिळाले आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असे नाव दिल्यानेच इंडिया नाव हटवण्यात आल्याची आगपाखड विरोधकांकडून होत आहे, तर भारत हा शब्द आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे, सांस्कृतिक संपत्तीचे, सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असल्याचे दाखले सत्ताधारी भाजपकडून देण्यात येत आहेत.