नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात कौतुकास्पद कामगिरी करत इराणचे जहाज समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरित्या सोडविले. भारतीय नौदलाने शुक्रवारी उशिरा याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे या जहाजावर 23 पाकिस्तानी नागरिक होते. या पाकिस्तानी नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने 12 तासांचे ऑपरेशन राबवले.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : बारामतीचं ठरलं; नणंद – भावजयीतच होणार लढत
नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या मासेमारी करणाऱ्या अल कंबार 786 या जहाजाचे समुद्री चाच्यांनी अपहरण केल्याची माहिती त्यांना गुरुवारी संध्याकाळी मिळाली होती. या आधारे भारतीय नौदलाने आयएनएस सुमेध आणि आयएनएस त्रिशूल या दोन युद्धनौका त्या जहाजाच्या सुटकेसाठी रवाना केल्या. या दोन्ही युद्धनौका अरबी समुद्रात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आल्या होत्या.
Successful Anti-Piracy Operation by the #IndianNavy.
After successfully forcing surrender of the nine armed pirates, #IndianNavy’s specialist teams have completed sanitisation & seaworthiness checks of FV Al-Kambar.
The crew comprising 23 Pakistani nationals were given a thorough… https://t.co/APEyIWmU9e pic.twitter.com/c6TbfL4Jrc— SpokespersonNavy (@indiannavy) March 30, 2024
हेही वाचा – Loksabha Election 2024 : कल्याण की ठाणे? भाजपच्या प्रस्तावाने मुख्यमंत्री नव्या पेचात
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आयएनएस सुमेधने अल कंबार 786 जहाजाला सोकोत्राच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 90 नॉटीकल माईलवर रोखले. काही वेळातच आयएनएस त्रिशूल देखील येथे पोहोचले. अखेर 12 तासांचे ऑपरेशन राबवल्यानंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे आत्मसमर्पण केले. या बोटीवरील 23 पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : नाशिकचा वाद सोडवण्यासाठी शिंदेंचा अजित पवारांना शिरूरचा प्रस्ताव; वाचा सविस्तर