घरअर्थजगतभारतीय वंशाच्या अमृता अहुजा हिंडेनबर्गच्या रडारवर, अहवालात कोणते आरोप?

भारतीय वंशाच्या अमृता अहुजा हिंडेनबर्गच्या रडारवर, अहवालात कोणते आरोप?

Subscribe

Amrita Ahuja News | अमृता अहुजा या भारतीय वंशांच्या असून त्यांचे पालक भारतीय आहेत. त्यांचे पालक क्लीव्हलँडमध्ये डे-केअर सेंटर चालवतात.

Amrita Ahuja News | नवी दिल्ली – अदानी समूहाची वाताहात केल्यानंतर हिंडेनबर्गने आता ब्लॉक इंक कंपनीतील गैरव्यवहार सार्वजनिक केला आहे. यामुळे या कंपनीचे शेअर्स तब्बल १८ टक्क्यांनी गडगडले आहे. ट्वीटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची ही कंपनी आहे. मात्र, या कंपनीतील भारतीय वंशांच्या असलेल्या अमृता अहुजासुद्धा हिंडेनबर्गच्या रडारवर आहेत. अहुजा यांनी या कंपनीतील शेअर्स डंप केल्याचा ठपका हिंडेनबर्गच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

अमृता अहुजा या ब्लॉक इंक कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी अर्थात सीएफओ आहेत. कंपनीचे शेअर्स डंप केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो डॉलर्स बुडाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – हिंडेनबर्गचा आणखी एक अहवाल, ब्लॉक इंक; वर फसवणुकीचा आरोप; कंपनीचे शेअर्स गडगडले

अमृता अहुजा या भारतीय वंशांच्या असून त्यांचे पालक भारतीय आहेत. त्यांचे पालक क्लीव्हलँडमध्ये डे-केअर सेंटर चालवतात. २००१ मध्ये अमृता यांनी मॉर्गन स्टॅनलीसोबत बँकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. मधल्या काळात त्यांनी Airbnb, McKinsey & Company, The Wall Disney, Fox सारख्या जागतिक कंपन्यांमध्ये काम केले आहे. तसंच, कॉल ऑफ ड्यूटी, कँडी क्रश, वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट यांसारखे गेम तयार करण्यासाठी त्यांनी व्हिडिओ गेम निर्माता ऍक्टीव्हिजन ब्लिझार्डसोबत काम केले.

- Advertisement -

२०१९ मध्ये त्या ब्लॉक इंक कंपनीमध्ये रुजू झाल्या. तर, २०२१ मध्ये त्यांना कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अर्थात सीएफओ बनवण्यात आले. फॉर्च्युन २०२२ समिटमध्ये त्यांचा सर्वांत शक्तीशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला होता.

ब्लॉक इंक कंपनीवर आरोप कोणते?

ब्लॉक इंक कंपनीने युजर्स वाढवून दाखवले आहेत, असा आरोप हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर कंपीनच्या शेअर्समध्ये तब्बल १८ टक्क्यांची घसरण झाली. हिंडेनबर्गने ब्लॉक इंक कंपनीची दोन वर्षे तपासणी केली. या कंपनीने तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. ४० ते ४५ टक्के खाती बनावट केली असून ही सर्व खाती एकाच व्यक्तीशी संबंधित आहेत. तसंच, सत्य माहिती लपवून जॅक डोर्सी यांच्या कंपनीने गुंतवणूकदारांची दिशाभूल केली, असे विविध आरोप हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -