जगभरातील ‘या’ दहा देशांमध्ये भारतीय वंशाचे नेते आहेत उच्च पदावर

जर ऋषी सुनक पंतप्रधानपदी विराजमान झाले तर ब्रिटन हा ११ वा देश असेल जिथे भारतीय वंशाचे नेते उच्च स्तरावर पोहोचले आहेत. परदेशात यशस्वी ठरलेले भारतीय वंशाचे राजकीय नेत्यांविषयी आपण जाणून घेऊयात.

rishi sunak

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी सोमवारी तिसरी फेरी झाली. या तिसऱ्या फेरीत आणखी एक उमेदवार बाहेर गेला आहे. आता भारतीय वंशाचे ऋषी सुनकसह चार उमेदवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे आहेत. यामध्ये ऋषी सुनक सर्वात पुढे असल्याचं म्हटलं जातंय. जर ते पंतप्रधान पदी विराजमान झाले तर ब्रिटन हा ११ वा देश असेल जिथे भारतीय वंशाचे नेते उच्च स्तरावर पोहोचले आहेत. परदेशात यशस्वी ठरलेले भारतीय वंशाचे राजकीय नेत्यांविषयी आपण जाणून घेऊयात. (Indian origin politicians in the world)

हेही वाचा – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर; मैदानात उरले फक्त चार प्रतिस्पर्धी

आतापर्यंत जगभरातील १० देशांत भारतीय वंशाचे नेते ३१ वेळा पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदी विराजमान झाले आहेत. यापैकी काही ठिकाणी अद्यापही भारतीय वंशाचे नेते राज्य करत आहेत. मॉरिशसमध्ये सर्वाधिक वेळा भारतीयांनी पद सांभाळले आहे. १९६८ मध्ये याचीसुरुवात झाली. १२ मार्च १९६८ साली पहिल्यांदा सीवूसागर रामगुलाम हे पंतप्रधान पदी विराजमान झाले. ३० जून १९८२ पर्यंत म्हणजे सलग १४ वर्षे ११० दिवस ते पंतप्रधान होते. रामगुलाम हे पहिले असे नेते आहेत ज्यांनी भारताबाहेर जाऊन इतर देशात आपलं राजकीय करिअर घडवलं.

मॉरिशस

 • सीवूसागुर रामगुलाम (Seewoosagur Ramgoolam) – १२ मार्च १९६८ ते ३० जून १९८२ पर्यंत पंतप्रधानपदी
 • अनिरुद्ध जगन्नाथ (Anerood Jugnauth) – जून १९८२ ते २२ डिसेंबर १९९५, १७ सप्टेंबर २००० ते ३० सप्टेंबर २००३ आणि १७ सप्टेंबर २०१४ ते २३ जानेवारी २०१७ पर्यंत तब्बल १८ वर्षे २३९ दिवस मॉरिशसचे पंतप्रधान होते. तर, ७ ऑक्टोबर २००३ ते ३१ मार्च २०१२ पर्यंत आठ वर्षे १७६ दिवस ते मॉरिशसचे राष्ट्रपती होते.
 • वीरसामी रिंगादू (Veerasamy Ringadoo) – १२ मार्च १९९२ ते ३० जून १९९२ पर्यंत ते मॉरिशसचे राष्ट्रपती होते.
 • कमस उतीम – ३० जून ते १५ फेब्रुवारी २००२ पर्यंत तब्बल ९ वर्षे २३० दिवस ते मॉरिशसचे राष्ट्रपती होते.
 • नवीन रामगुलाम – २७ डिसेंबर १९९५ ते ११ सप्टेंबर २००० आणि ५ जुलै २००५ ते १७ सप्टेंबर २०१४ पर्यंत तब्बल १४ वर्षे ५९ दिवस ते पंतप्रधान होते.
 • कैलाश पुरयाग – २१ जुलै २०१२ ते २९ मे २०१५ पर्यंत दोन वर्षे ३१२ दिवस ते राष्ट्रपती होते.
 • अमीना गुरीब-फकीम – ५ जून २०१५ ते २३ मार्च २०१८ पर्यंत दोन वर्षे २९१ दिवस ते राष्ट्रपती होते.
 • प्रविंद जगन्नाथ – २३ जानेवारी २०१७ ते आतापर्यंत ५ वर्षे ते पंतप्रधान आहेत.
 • पृथ्वीराजसिंह रुपुन – २ डिसेंबर २०१९ ते आतापर्यंत ते राष्ट्रपती आहे.

सूरीनाम

 • फ्रेड रामदत मिसिअर – ८ फेब्रुवारी १९८२ ते २५ जानेवारी १९८८ पर्यंत सलग पाच वर्षे सूरीनाम देशाचे राष्ट्रपती होते.
 • एरोल अलीबक्स – २६ फेब्रुवारी १९८३ ते ८ जानेवारी १९८४ कालावधीत ते पंतप्रधान होते.
 • प्रेताप राधाकिशुन – १७ जुलै १९८६ ते ७ एप्रिल १९८७ पर्यंत ते पंतप्रधान होते.
 • रामसेवक शंकर – २५ जानेवारी १९८८ ते २४ डिसेंबर १९९० पर्यंत ते राष्ट्रपती होते.
 • चान संतोखि – १६ जुलै २०२० पासून आतापर्यंत ते या देशाचे राष्ट्रपती आहेत.

हेही वाचा – अटारी बॉर्डरजवळ पोलीस आणि गँगस्टरमध्ये चकमक, सिद्धू मुसेवालाचा हल्लेखोर ठार

गुयाना

 • छेदी जगन – ९ ऑक्टोबर १९९२ ते ६ मार्च १९९७ पर्यंत ४ वर्षे ते या देशाचे राष्ट्रपती होते.
 • भरत जगदेव – ११ ऑगस्ट १९९९ ते ३ डिसेंबर २०११ तब्बल १२ वर्षे ते राष्ट्रपती होते.
 • डोनाल्ड रामातोर – ३ डिसेंबर २०११ ते १६ मे २०१५ पर्यंत ते राष्ट्रपती राहिले.
 • इरफान अली – २ ऑगस्ट २०२० पासून ते आजपर्यंत राष्ट्रपतीपदावर आहेत.

सिंगापूर

 • देवन नायर – २३ ऑक्टोबर १९८१ ते २७ मार्च १९८५ पर्यंत ते राष्ट्रपती पदावर राहिले.
 • एसआर नाथन – १ सप्टेंबर १९९९ ते ३१ ऑगस्ट २०११ पर्यंत तब्बल १२ वर्षे ते राष्ट्रपती पदावर होते.
 • हलीमा याकूब – १४ सप्टेंबर २०१७ ते आतापर्यंत राष्ट्रपती आहेत.

हेही वाचा – रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, १३४ मतांनी विजयी

त्रिनिदाद आणि टोबॅगो

नूर हसन अली – २० मार्च १९८७ ते १७ मार्च १९९७ पर्यंत तब्बल १० वर्षे ते राष्ट्रपती होते.

बसदेव पांडे – ९ नोव्हेंबर १९९५ ते २४ डिसेंबर २००१ पर्यंत ६ वर्षे ३६२ दिवस त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं.

कमला प्रसाद-बिसेसर – २६ मे २०१० ते ९ सप्टेंबर २०१५ पर्यंत ५ वर्षे १०८ दिवस ते राष्ट्रपती होते.

पोर्तुगाल

 • अल्फ्रेडो नोब्रे दा कोस्टा – २८ ऑगस्ट १९७८ ते २२ नोव्हेंबर १९७८ पर्यंत ते पंतप्रधान राहिले.
 • एंटोनियो कोस्टा – २७ नोव्हेंबर २०१५ ते आतापर्यंत ६ वर्षे ते पंतप्रधान होते.

मलेशिया

 • महाथिर मोहम्मद – १६ जुलै १९९८१ ते ३१ ऑक्टोबर २००३, १० मे २०१८ ते १ मार्च २०२० कालावधीत ते या देशाचे पंतप्रधान होते. जवळपास २४ वर्षे त्यांनी मलेशियात सत्ता गाजवली.

फिजी

 • महेंद्र चौधरी – १९ मे १९९९ ते २७ मे २००० या आठ वर्षांच्या काळात त्यांनी पंतप्रधानपद सांभाळले.

आयर्लंड

 • लियो वराडकर- १४ जून २०१७ ते २७ जून २०२० काळात ते आयर्लंडचे पंतप्रधान होते.

सेशल्स

 • वेवन रामकलावन – २६ ऑक्टोबर २०२० ते आजपर्यंत मध्ये ते राष्ट्रपती होते.

हेही वाचा – भारताचा कोरोना लसीकरणाचा २०० कोटींचा टप्पा पार; पंतप्रधान मोदींचे बिल गेट्सकडून कौतुक