घरदेश-विदेशइंदिरा गांधींना शिक्षा झाली तेव्हा... जाणून घ्या सोनिया-राहुलयांच्यासह गांधी कुटुंबीयांवरील केसेस

इंदिरा गांधींना शिक्षा झाली तेव्हा… जाणून घ्या सोनिया-राहुलयांच्यासह गांधी कुटुंबीयांवरील केसेस

Subscribe

गांधी कुटुंबीयांवर सुरु असलेल्या केसेस, तसेच, याआधी कोणत्या प्रकरणात आढळले आहेत दोषी. जाणून घ्या सविस्तर

राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अनेकवेळा सत्तेची धुरा सांभाळणाऱ्या गांधी कुटुंबासाठी कोर्ट-कचेरी हे काही नवे नाही. तसे पाहिले तर एखाद्या प्रकरणात दोषी आढळण्याची सुरुवात ही गांधी घराण्यात इंदिरा गांधींपासून सुरु झाली. आपण आज गांधी कुटुंबियांवर सुरु असलेल्या केसेसबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

12 जून 1975 ला सकाळी 10 वाजता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कोर्ट रुम नंबर 24 मध्ये एक ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. ज्याने दुस-याच क्षणी भारतातील राजकारण बदलले. न्यायाधीश जगमोहन सिन्हा यांनी रायबरेलीच्या निवडणूकीत इंदिरा गांधी दोषी आहेत, त्यामुळे त्यांनी लढवलेली निवडणूक रद्द केली जात असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्यानंतर भारतात जे घडलं तो इतिहास आहे.

- Advertisement -

माजी पंतप्रधानांवरील आरोप 

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये रायबरेली येथून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांच्या या विजयाला प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. हे प्रकरण इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण म्हणून ओळखले जाते. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजनारायण यांनी न्यायालयात जाऊन इंदिरा गांधींवर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप केला. 12 जून 1975 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.

राहूल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात मागितली माफी

काँग्रेस खासदार राहुल गांधी गुरुवारी मानहानीच्या खटल्यात दोषी आढळले असले तरी त्यांच्यावर अजूनही अशी अनेक प्रकरणे आहेत जी न्यायालयात आहेत आणि त्यावर सुनावणी सुरू आहे.

- Advertisement -

2019 च्या सुरुवातीला काँग्रेस अध्यक्ष असताना त्यांनी ‘चौकीदार चोर है’ या विधानाबद्दल सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली होती. अवमान प्रकरणात यापूर्वी दाखल केलेल्या दोन प्रतिज्ञापत्रांमध्ये राहुल गांधी यांनी केवळ खेद व्यक्त केला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना फटकारले. यानंतर राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली होती.

( हेही वाचा: आशियातील अर्थव्यवस्थेबाबत Moody’s चा मोठा दावा; भारताला दिला धोक्याचा इशारा )

2014 मध्येही राहुल गांधी आले होते अडचणीत

2014 मध्ये राहुल गांधी हे RSS वर केलेल्या वक्तव्यामुळे अडकले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी 2014 मध्ये ठाण्यातील भिवंडी शहरात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिष्ठा डागाळल्याचा दावा कुंटे यांनी केला आहे. या प्रकरणी 2018 मध्ये भिवंडी न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले होते. आता फेब्रुवारी 2023 मध्ये या प्रकरणी सुनावणी झाली.

झारखंड हायकोर्टातही केस

2018 च्या काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये कोणताही खुनी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, हे फक्त भाजपमध्येच शक्य आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बदनामी झाल्याचे म्हटले गेले. त्यानंतर राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात रांची दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्याची न्यायालयाने दखल घेतली. आठवडाभरापूर्वी याप्रकरणी सुनावणी झाली होती. या सुनावणीत न्यायालयाने राहुल गांधींना दिलेला दिलासा कायम ठेवला होता.

( हेही वाचा: देश हुकूमशाहीच्या वाटेवर, पण आम्ही…; संजय राऊत यांचा केंद्रावर घणाघात )

नॅशनल हेराॅल्ड प्रकरण

2019 मध्येच निवडणूक आयोगात राहुल गांधींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याविरुद्ध पाच खटले सुरू आहेत आणि या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.

गांधी घराण्यात काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी यांच्यावरही अनेक प्रकरणे आहेत, ज्यात तपास आणि न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. यातील सर्वात मोठे प्रकरण नॅशनल हेराॅल्ड. याबाबत ईडीची चौकशी सुरू आहे. डिसेंबर 2015 मध्ये पटियाला हाऊस कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.

बिकानेर जमीन प्रकरण

प्रियंका गांधी यांचा नवरा आणि गांधी कुटुंबाचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचीही चौकशी सुरू आहे. ईडी बिकानेरमधील जमिनीच्या विक्री आणि खरेदीशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहे. ही जमीन बिकानेरच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमधील विस्थापितांना दिली जाणार होती. मात्र ती चुकीच्या पद्धतीने खरेदी करण्यात आली. बिकानेर जमीन गैरव्यवहार प्रकरणी जोधपूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -