देशभरातील रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधा अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने रेल्वेने पुढाकार घेतला आहे. देशातील काही ठराविक रेल्वे स्थानकांवर ग्राहकोपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने रेल्वेने पुढाकार घेतला आहे. रेल्वेच्या कॉमन सर्व्हीस सेंटरने (CSC) किऑक्सच्या मदतीने अनेक सुविधा याठिकाणी उपलब्ध होणार आहेत. भारतातील तब्बल २०० स्टेशनवर हे किऑस्क उभारण्यात येणार आहेत. या सुविधांमध्ये महत्वाची सुविधा म्हणजे ग्राहकांना पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड काढण्याची सुविधाही याठिकाणी मिळणार आहे. त्याशिवाय मोबाईल रिचार्ज, विजेच्या बिलाचा भरणा करणे, टॅक्स अदा करणे यासाऱख्या सुविधाही किऑस्कच्या ठिकाणी उपलब्ध होतील. रेलटेलच्या माध्यमातून हे कॉमन सर्व्हीस सेंटर उभारण्यात येणार आहेत. हे कॉमन सर्व्हीस सेंटर्स ई गव्हनर्स सर्व्हीसेस इंडिया लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून भागिदारी तत्वावर उभारण्यात येणार आहेत. हे किऑस्क ग्रामीण पातळीवर उद्योगांमार्फत चालविण्यात येतील.
किऑस्कला कोणत्या सुविधा उपलब्ध ?
सीएससीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सेवांमध्ये प्रवासाचे तिकिट (ट्रेन, एअरप्लेन आणि बस) काढता येतील. मोबाईल रिचार्ज आणि विजेच्या बिलभरण्याचाही यामध्ये समावेश असेल. त्याशिवाय आधार कार्ड, पॅनकार्ड, आयकर भरण्याची सुविधा, विमा भरण्याची सुविधा तसेच बॅंकिंगचा पर्यायही यामध्ये उपलब्ध होईल. या किऑस्कच्या सेवेला रेलवायर साथी कियॉक्स हे नाव देण्यात आले आहे. रेलवायर रेलटेलच्या ब्रॉंडबॅंड सेवेचे नाव आहे.
याठिकाणी प्रायोगिक प्रकल्प
देशात एकुण २०० ठिकाणी सीएससी किऑक्स उभारण्याचा रेल्वेचा मानस आहे. प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत देशात सर्वात प्रथम वाराणसी शहर आणि उत्तर प्रदेशच्या प्रयागराज शहरात रेलवायर साथी सीएससी किऑस्क लावण्यात येईल. देशात २०० ठिकाणी किऑस्क उभारण्याचा मानस असून टप्पेनिहाय पद्धतीने या किऑस्क मशीन लावण्यात येतील. सर्वाधिक असे ग्रामीण भागातून हे किऑस्क चालविण्यात येतील.
ग्रामीण भागाला होणार फायदा
रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी ग्रामीण क्षेत्रात लोकांना विभिन्न ई गव्हर्नन्स सेवांच्या लाभ घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये अनेकदा डिजिटलायजेशनचा लाभ घेताना नागरिकांना अडचणी येत असल्याचेही त्यांनी म्हटले. रेलवायर किऑस्कच्या माध्यमातून ग्रामीण भागात रेल्वे सुविधांसाठी किऑस्कमध्ये या सुविधांचा फायदा होईल.
वायफाय सुविधा
देशातील जवळपास ६०९० स्टेशन्स हे रेलटेल सुविधेच्या माध्यमातून वायफायच्या कनेक्टिव्हिटीने कनेक्टेड आहेत. देशातील सर्वात मोठा हा नेटवर्क आहे. तसेच पाच हजार ग्रामीण भागातील स्थानकांवर ही वायफायची सुविधा आहे. या वायफायच्या कनेक्टिव्हिटीच्या जोरावरच देशात सीएससीच्या माध्यमातून ग्रामीण भागात ब्रॉडबॅंड सेवेसोबतच किऑस्कची सुविधा देण्याचा मानस ठेवण्यात आला आहे.