घरताज्या घडामोडीमोठी बातमी! रेल्वे प्रशासनाकडून 372 गाड्या रद्द; जाणून घ्या सविस्तर वृत्त

मोठी बातमी! रेल्वे प्रशासनाकडून 372 गाड्या रद्द; जाणून घ्या सविस्तर वृत्त

Subscribe

रेल्वेने प्रवास (Railway Passengers) करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेकडून सोमवार 30 मे रोजी 372 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये बहुतेक प्रवासी आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे.

रेल्वेने प्रवास (Railway Passengers) करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेकडून सोमवार 30 मे रोजी 372 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये बहुतेक प्रवासी आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. ऐनवेळी गाड्या रद्द झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे. मात्र, आजच्या दिवसी प्रवासासाठी अनेक प्रवाशांनी अगोदरच तिकीटांचे बुकींग करून ठेवले होते. परंतु, आज ट्रेन रद्द झाल्याने त्यांना या तिकीटांचा परतावा मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करण्याचे कारण नाही.

भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रशासनाने 30 मे रोजी एकूण 372 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 गाड्या वळवण्यात आल्या आहेत. तसेच, 11 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

गाड्यांबाबतची माहिती अशी तपासा

रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटला भेट द्या.
Exceptional Trains पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.
रद्द करा, रीशेड्युल करा आणि वळवा ट्रेनच्या यादीवर क्लिक करा.
या तिघांची यादी तपासल्यानंतरच घराबाहेर पडा.

- Advertisement -

दरम्यान, भारतीय रेल्वे सातत्याने प्रवाशांना योग्य सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. तसेच, प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ट्रेनचा दर्जावर काम करत असते. गाड्या रद्द करणे, वेळापत्रक बदलणे किंवा वळवणे यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे रेल्वे रुळांची दुरुस्ती.

रेल्वे रुळावरून दररोज हजारो गाड्या जातात. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून रेल्वे रुळांची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. याशिवाय कधी-कधी खराब हवामान किंवा इतर कारणांमुळे गाड्या रद्द कराव्या लागतात. काही वेळा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गाड्या रद्द करण्याचा निर्णयही रेल्वेला द्यावा लागतो.


हेही वाचा – Modi Govt 3 Years: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 3 वर्षे पूर्ण, पुढील 15 दिवस जनसंपर्क अभियान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -