कोळशाच्या अपुऱ्या साठ्याचे संकट; त्यात सरकारनं रद्द केल्या ‘इतक्या’ ट्रेन

कोळश्याच्या अपुऱ्या साठ्यामुळे देशभरातील जनतेवर सध्या वीजेचे संकट आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील 20 दिवस देशभरातील किमान 1100 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Indian Railway Strike so the train will not run across the country on may station masters are going on strike
Indian Railway Strike : आता रेल्वे स्टेशन मास्टरांचे आंदोलन; रेल्वे प्रवासावर होणार परिणाम

कोळश्याच्या अपुऱ्या साठ्यामुळे देशभरातील जनतेवर सध्या वीजेचे संकट आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील 20 दिवस देशभरातील किमान 1100 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे गाड्या रद्द करण्याच्या सरकारच्या या निर्णयानंतर प्रवाशांसह व्यापारी वर्ग नाराजी व्यक्त करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औष्णिक वीज केंद्राला कोळसा पुरवणार्‍या मालगाड्यांना मार्ग देण्यासाठी प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील एक महिन्यासाठी रेल्वेने 670 पॅसेंजर गाड्या आधीच रद्द केल्या आहेत. त्यानंतर आता या गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेच्या या निर्णयानंतर आता प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे.

छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंड यांसारख्या कोळसा उत्पादक राज्यांतून ये-जा करणाऱ्या लोकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. देशातील अनेक वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळसा संकटाचा सामना करावा लागत आहे. याला सामोरे जाण्यासाठी आणि कोळशाचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे 15 टक्के अतिरिक्त कोळशाची वाहतूक करत आहे.

त्यामुळे रेल्वेने पुढील 20 दिवस सुमारे 1100 प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर या दोन्ही गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. एक्स्प्रेस गाड्यांच्या 500 फेऱ्या, तर पॅसेंजर गाड्यांच्या 580 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईसह देशभरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळं उकाड्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उकाड्यामुळं एप्रिल महिन्यापासून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विजेची मागणी वाढल्याने कोळशाचा वापरही वाढला आहे.


हेही वाचा – नवनीत राणांची जेलमधून सुटका, छातीत दुखत असल्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल