घरदेश-विदेशIndian Railway : रेल्वेत पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी केला जातोय 'हा' महत्त्वाचा...

Indian Railway : रेल्वेत पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी केला जातोय ‘हा’ महत्त्वाचा बदल; प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य

Subscribe

ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या आई आणि मुलाचा प्रवास आता पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी होणार आहे. भारतीय रेल्वेने पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र बेबी बर्थ बनवण्यावर विचारमंथन सुरू केले आहे.

ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या आई आणि मुलाचा प्रवास आता पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी होणार आहे. भारतीय रेल्वेने पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र बेबी बर्थ बनवण्यावर विचारमंथन सुरू केले आहे. बेबी बर्थची दुसरी चाचणी येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यानंतर सर्व गाड्यांमधील बेबी बर्थबाबत बदल केले जातील. मात्र, लहान मुलांसाठी असलेल्या या स्पेशल बर्थचे भाडे किती असेल याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार आहे. ( Indian Railway changing birth style for infant in train new baby birth will be something like this 2023 )

काही काळापूर्वी ट्रायल म्हणून ट्रेनमध्ये बेबी बर्थची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्याची चाचणी 08 मे 2022 रोजी लखनऊ मेलवरून सुरू झाली. चाचणीच्या काही दिवसांनंतर, सोशल मीडियावर या निर्णयाच्या कौतुकासह काही  उणिवाही सांगितल्या जात होत्या, त्यानंतर बेबी बर्थमधील त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा काम सुरु करण्यात आले. आता नवीन बदलांसह बेबी बर्थ पुन्हा दुसऱ्या चाचणीसाठी सज्ज आहे. मुलांनुसार बनवलेले हे नवीन डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक आणि सुरक्षित असेल.

- Advertisement -

मध्य प्रदेशचे राज्यसभा खासदार आणि भाजप नेते डॉ. सुमेरसिंग सोलंकी सांगतात की, बेबी बर्थच्या रचनेत बदल करण्याबाबत त्यांनी अलीकडेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. यादरम्यान, मी रेल्वेमंत्र्यांना सुचवले होते की, आई आणि मुलासाठी कॉमन बर्थवर एकत्र झोपण्यात खूप त्रास होतो. अशी परिस्थिती पाहता बेबी बर्थच्या रचनेत काही बदल केले पाहिजेत.

डॉ. सोलंकी सांगतात की,  बेबी बर्थबाबत मी आतापर्यंत तीनवेळा रेल्वेमंत्र्यांना भेटलो. माझ्या सूचनेनुसार, त्यांनी ट्रेनमध्ये नवीन डिझाइन बेबी बर्थची दुसरी चाचणी सुरू केली आहे. प्रत्येक कोचमध्ये प्रत्येक सीटसह हा नवीन बेबी-बर्थ बसवण्याची गरज नाही. रेल्वे हे बेबी-बर्थ तिकिट बुक करताना बुक करणार्‍या प्रवाशाला देईल. प्रत्येक सीटवर बेबी-बर्थ बसवण्यासाठी प्रवासी TTE किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतील. बेबी बर्थ हुकच्या मदतीने सामान्य बर्थला जोडता येते. नवीन डिझाइन केलेले बेबी-बर्थ सर्व वर्गांच्या डब्यांमध्ये सहजपणे बसवता येते. त्याची किंमतही रेल्वेला प्रति बर्थ १०० रुपयांपेक्षा कमी आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: Ranking कोण देतं यावर सर्व ठरत असतं; सर्वोच्च न्यायालयाची मिश्किल टिप्पणी )

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या चाचणीदरम्यान बेबी बर्थचा हा सामान्य बर्थच्या दिशेने ओपन होता. त्यामुळे वरच्या बर्थवरून मुलाला दुखापत होण्याची किंवा मुलाच्या अंगावर कोणतेही साहित्य पडण्याची भीती होती. या उणिवा लक्षात घेऊन, बेबी बर्थ आता सुरक्षित पडद्याने झाकलेला असेल. जेणेकरून मूलं सुरक्षितपणे झोपू शकतील आणि आईही बाळाला स्तनपान करू शकेल. याशिवाय लहान मुलांना लक्षात घेऊन स्क्रीनवर कार्टूनही छापण्यात येणार आहेत. बर्थची यशस्वी चाचणी झाल्यानंतर लवकरच सर्व ट्रेनमध्ये बेबी बर्थची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -