घरदेश-विदेशIndian Railway : भारतीय रेल्वेच्या 'या' सेवा लवकरच होणार बंद, पण प्रवास...

Indian Railway : भारतीय रेल्वेच्या ‘या’ सेवा लवकरच होणार बंद, पण प्रवास होणार जलद

Subscribe

भारतीय रेल्वे प्रशासनाने लेट फितीचा कारभार संपण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यात भारतीय रेल्वेने गाड्यांना ठरावीक स्थानकापर्यंत वेळेवर पोहचण्यासाठी काही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी काही रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी अधिक वेळ जात होता. यामुळे भारतीय रेल्वेने आता आठ रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच म्हणजेच स्लीपर कोच किंवा लिंक एक्सप्रेस न जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच प्रवास अधिकच जलद होणारआहे.

रेल्वे प्रशासन जाहीर करणार नवे वेळापत्रक

भारतीय रेल्वेने य़ा निर्णयानंतर रेल्वे गाड्यांसाठी नवे वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षात ऑक्टोबरमध्ये रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर केला जात होते. अशातच कोरोना संकटामुळे रेल्वे प्रशासनाने काही विशेष रेल्वे गाड्या सुरु केल्या. त्यामुळे गेल्यावर्षी रेल्वेने नवे वेळापत्रक जाहीर केले नाही. मात्र यंदा रेल्वे गाड्यांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्याची तयारी सुरु झाली आहे. यात अनेक रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अनेक गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्य़ात आल्या आहेत. याशिवाय रेल्वे मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यासाठी लिंक एक्सप्रेस गाड्या बंद करण्य़ाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

‘या’ रेल्वे गाड्यांमधील काही सेवा होणार बंद

दिल्ली-देहराडून मसूरी एक्सप्रेसला तीन स्लीपर कोच हरिद्वारपर्यंत जोडले जातात. ही गाडी हरिद्वारला पोहचल्यानंतर हे कोच वेगळे करत एक्सप्रेस देहराडूनच्या दिशेने रवाना होते. नवे वेळापत्रक जाहीर होताच, स्लीपर कोच वेगळे केले जाणार नाहीत. यामुळे संपूर्ण ट्रेनचं देहराडूनच्या दिशेने रवाना होईल.

यासह कालका- श्रीगंगानगर, हरिद्वार- ऊना हिमाचल जनशताब्दी एक्सप्रेस , वाराणसी-देहराडून एक्सप्रेस, कोच्चुवेली-देहराडून एक्सप्रेस, ओखा-देहराडून एक्सप्रेस, मदुराई-देहराडून एक्सप्रेस आणि हावडा-देहराडून एक्सप्रेसमध्येही लिंक एक्सप्रेस आणि स्लीपर कोच सेवा जोडली जाणार नाही.

- Advertisement -

लिंक एक्सप्रेस नेमकी असते कशी?

लिंक एक्सप्रेसला वेगवेगळ्या स्थानकांहून जाणाऱ्या दोन गाड्यांना कोणत्याही स्थानकावर जोडले जाते. यानंतर दोन्ही गाड्यांची एक गाडी बनवत निश्चित स्थानकापर्यंत पोहचवले जाते.

स्लीपर कोच नेमका कसा असतो?

काही रेल्वे गाड्यांचे काही कोच विविध रेल्वे स्थानकांवर वेगळे केला जातात. यानंतर मूळ गाडी ठरविक स्थानकाच्या दिशेने रवाना होतात. याच गाडीचे वेगळे केलेले डब्बे कोणत्याही गाड्यांना जोडून निश्चित स्थानकावर पोहचवले जातात.

वेळेची होणार बचत

एखादी लिंक एक्सप्रेस किंवा स्लीपर कोच कोणत्याही दोन गाड्यांना किंवा कोणत्याही कोचला जोडण्य़ासाठी किंवा वेगळे करण्यासाठी अधिक वेळ वाया जातो. यामुळे त्या मार्गावरील इतर रेल्वे गाड्यांना थांबवावे लागत होते. यामुळे रेल्वे गाड्यांना निश्चित वेळी ठरावीक स्थानकांपर्यंत पोहचण्यसाठी अधिक वेळ लागतो. ज्याचा प्रवाशांना देखील सामना करावा लागतो. मात्र ही सिस्टमचं रेल्वे प्रशासन आता बंद करणार आहे.


Terrorist : मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, सुरक्षेसाठी उभारलं जाणार आता नवं मॉडल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -