घरCORONA UPDATEIndian RailWay: रेल्वे कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे सावट, दररोज १ हजारांहून कर्मचारी बाधित

Indian RailWay: रेल्वे कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे सावट, दररोज १ हजारांहून कर्मचारी बाधित

Subscribe

आता पर्यंत १ हजार ९५२ भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

संपूर्ण देश कोरोनाच्या ( Covid 19) संकटात आहे. देशातील बाधितांचा आकडा ४ लाखांपर्यंत पोहचला होता. दररोज लाखो जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय रेल्वेही कोरोनाच्या सावटाखाली आली आहे. भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. भारतीय रेल्वेमध्ये दररोज १००० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे. त्याचप्रमाणे आता पर्यंत १ हजार ९५२ भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात भारतीय रेल्वेची अवस्था सुद्धा देशातील इतर राज्यांप्रमाणेच आहे. भारतीय रेल्वेचे कर्मचारी कोरोनाचा सामना करत आहेत. आम्ही या काळात लोकांना हवी ती मदत करत आहोत. पण आमची परिस्थितीही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

भारतीय रेल्वे त्यांच्या कर्मचाऱ्यांची पुरेपूर काळजी घेत आहेत. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकिय सुविधा पुरवत आहोत. ४ हजार रेल्वे कर्मचारी त्याचबरोबर कुटुंबीय रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहेत. रेल्वेच्या रुग्णालयात चादरींची संख्या वाढण्यात आली आहे त्याचबरोबर रुग्णालयात ऑक्सिजन देखिल बसवण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेचे सर्व कर्मचारी लवकर बरे होतील,असे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले.

- Advertisement -

भारतीय रेल्वे ऑक्सिजन सिलेंडर पोहचवण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. १९ एप्रिल ते ९ मे पर्यंत २६८ टँकरच्या सहाय्याने देशातील विविध राज्यात २ हजार २०० मॅट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पोहचवले आहे. आता पर्यंत ६८ ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेनच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. भारतीय रेल्वे मार्फत महाराष्ट्राल २९३ टन मेडिकल ऑक्सिजन पोहचवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशला १ हजार २३० टन मध्यप्रदेशात २७१ टन तर हरियाणा राज्यात ५५ टन ऑक्सिजन पुरवठा केला आहे. त्याचबरोबर तेलंगणामध्ये १२३ टन ऑक्सिजन. राजधानी दिल्लीत १ हजार ६७९ टन आणि राजस्थान राज्यात ४० टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.


हेही वाचा – Railway Recruitment 2021: दहावी पास आहात? रेल्वेत नोकरीची संधी; ७५ हजारांपर्यंत मिळणार पगार

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -