घरदेश-विदेशIndian Railway Strike : आता रेल्वे स्टेशन मास्टरांचे आंदोलन; रेल्वे प्रवासावर होणार...

Indian Railway Strike : आता रेल्वे स्टेशन मास्टरांचे आंदोलन; रेल्वे प्रवासावर होणार परिणाम

Subscribe

यातील प्रमुख मागण्यांसाठी आता पुन्हा ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनने रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे संपाची नोटीस पाठवली आहे.

केंद्र सरकारने (Railway Ministry) वेळीच उपाययोजना न केल्यास या महिन्याच्या 31 तारखेला देशभरातील रेल्वे सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे भारतीय रेल्वेच्या सर्व स्टेशन मास्टर (Station Master) सामूहिक रजेवर (Mass Leave) जाणार आहे. रेल्वेच्या उदासीनतेमुळे देशभरातील सुमारे 35 हजार स्टेशन मास्टरांनी रेल्वे बोर्डाला नोटीस दिली आहे. यामध्ये 31 मे रोजी संपावर जाण्याचे सांगण्यात आले आहे. अखिल भारतीय स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांचे आता त्यांच्याकडे रेल्वे स्टेशन मास्टरांच्या सामूहिक रजेवर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हणणे आहे.

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर ‘या’ वेळेत असेल मेगा ब्लॉक

सध्या देशभरात सहा हजारांहून अधिक स्टेशन मास्टर्सची कमतरता आहे. आणि रेल्वे प्रशासन या पदावर भरती करत नाही. त्यामुळे देशातील अर्ध्याहून अधिक स्थानकांवर सध्या केवळ दोनच स्टेशन मास्टरांची नियुक्ती आहे. स्टेशन मास्तरांची शिफ्ट आठ तासांची असली तरी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना दररोज 12 तासांची शिफ्ट करावी लागते. कराव्या लागतात. ज्या दिवशी स्टेशन मास्टरला साप्ताहिक सुट्टी असते, त्या दिवशी कर्मचाऱ्याला दुसऱ्या स्थानकावरून बोलावावे लागते. अशा परिस्थितीत कोणत्याही कर्मचार्‍यांची प्रकृती बिघडली किंवा त्यांच्या घरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर अनेक अडचणींचा सामना त्या कर्मचाऱ्याला करावा लागतो. (indian railway)

- Advertisement -

त्यामुळे ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनने स्टेशन मास्तरांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 31 मे 2022 रोजी संपूर्ण भारतात एक दिवशीय सुट्टीची घोषणा केली आहे. संपूर्ण भारतातील 35,000 स्टेशन मास्तर आपल्या अनेक मागण्यांसाठी 7 ऑक्टोबर 2020 पासून आंदोलन करत आहे. यातील प्रमुख मागण्यांसाठी आता पुन्हा ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनने रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे संपाची नोटीस पाठवली आहे.

ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय?

1) रेल्वेतील सर्व रिक्त पदे तातडीने भरणे.

- Advertisement -

2) कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्ता बहाल करणे.

4) स्टेशन मास्टर्सच्या संवर्गात 16.02.2018 ऐवजी 01.01.2016 पासून MACP चा लाभ द्या

5) सुधारित पदनामांसह संवर्गांची पुनर्रचना करणे.

6) रेल्वे सुरक्षित आणि वेळेवर धावण्यासाठी स्टेशन मास्टर्सना त्यांच्या योगदानासाठी सुरक्षा आणि तणाव भत्ता प्रदान करणे.

7) रेल्वेचे खाजगीकरण आणि कॉर्पोरेटायझेशन थांबवा.

8) नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणे.

या प्रमुख मागण्या रेल्वे प्रशासनाकडून मान्य न झाल्याने स्टेशन मास्टर असोसिएशनने एक दिवसाचा संप करण्याचा निर्णय घेतला आहे.


pune news : लाल महालात लावणी,आव्हाडांचा ट्विट करून निषेध

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -