घरताज्या घडामोडीआता नेहमीच मिळणार कन्फर्म तिकीट; रेल्वेचे प्रवाशांना मोठे गिफ्ट

आता नेहमीच मिळणार कन्फर्म तिकीट; रेल्वेचे प्रवाशांना मोठे गिफ्ट

Subscribe

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तिकीट कन्फर्मेशनची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला यापुढे चालत्या ट्रेनमध्ये वेटिंग किंवा आरएसी तिकिटांची पुष्टी करण्यासाठी टीटीला विनंती करावी लागणार नाही.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तिकीट कन्फर्मेशनची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला यापुढे चालत्या ट्रेनमध्ये वेटिंग किंवा आरएसी तिकिटांची पुष्टी करण्यासाठी टीटीला विनंती करावी लागणार नाही. रेल्वे प्रीमियम, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या टीटीला हँड हेल्ड टर्मिनल डिव्हाइस देणार आहे. रेल्वेने याची सुरुवात केली आहे. तसेच, हे एचएचटी डिव्‍हाइसेस रिकामे बर्थ वेटिंग किंवा आरएसी नंबर आणि श्रेणीनुसार आपोआप कन्फर्म होतील. (Indian railway waiting will be confirmed by hand held terminal device)

रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे ट्रेनमध्ये वेटिंग (विंडो तिकीट) आणि आरएसी तिकिटांवर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय रेल्वेने याआधी प्रायोगिक प्रकल्पांतर्गत काही प्रीमियम गाड्यांमध्ये (राजधानी, शताब्दी) टीटींना एचएचटी डिव्‍हाइस दिली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

- Advertisement -

परिणामी प्रवाशांचे वेटिंग किंवा आरएसी तिकीट चार्ट चालत्या ट्रेनमध्ये आपोआप कन्फर्म झाले होते. शिवाय प्रवाशांना त्यासंदर्भात मेसेजही मिळाला होता. त्यानंतर, भारतीय रेल्वेने 559 ट्रेनमध्ये टीटीला 5850 HHT डिव्‍हाइस दिली आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हळूहळू हे उपकरण प्रीमियम ट्रेनसह सर्व मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसवले जाणार आहे.

रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, चालत्या ट्रेनमध्ये एका दिवसात 523604 तिकीटांचे आरक्षण करण्यात आली होती. यामध्ये 242825 तिकिटे चालत्या ट्रेनमध्ये HHT यंत्राद्वारे तपासण्यात आली होती. त्यापैकी 18 हजारांहून अधिक आरएसी आणि नऊ हजारांहून अधिक वेटिंग तिकिटे कन्फर्म झाली आहेत.

- Advertisement -

याबाबत रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सामान्य दिवसांमध्ये दररोज 12.5 लाख तिकीटांचे आरक्षणे असतात. अशा परिस्थितीत, मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एचएचटी डिव्हाइसद्वारे तिकिटे तपासली गेली. तर कन्फर्म तिकिटांची संख्या वाढेल.


हेही वाचा – निवडणुक प्रचारादरम्यानच्या मोफत घोषणांबाबत सुप्रीम कोर्टाने संबंधित संस्थांकडे मागितल्या सुचना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -